Join us

​नव्या वर्षात डेमी घेणार संगीतातून ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2016 18:29 IST

गायिका डेमी लोवातो नव्या वर्षात संगीतातून ब्रेक घेवून चॅरिटीकडे लक्ष केंद्रीत करणार आहे. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार लोवातोने गेल्या ...

गायिका डेमी लोवातो नव्या वर्षात संगीतातून ब्रेक घेवून चॅरिटीकडे लक्ष केंद्रीत करणार आहे. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार लोवातोने गेल्या बुधवारी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करताना म्हटले की, २०१७ या वर्षाच्या स्वागातासाठी मी आतूर आहे.  नव्या वर्षात संगीत आणि झगमगटाच्या दुनियेतून ब्रेक घेणार आहे. पुढे मला संगीत आणि मीडियाचे काहीही देणेघेणे नाही. कारण मला चॅरिटीसाठी काम करायचे आहे. लोवातोने ‘बर्नी आणि फ्रेंड्स’मधून बालकलाकाराच्या रुपाने करियरला सुरुवात केली होती. तिने २००८ मध्ये आलेल्या ‘कॅँप रॉक’ या चित्रपटात देखील काम केले होते. तिचा पहिला डेब्यू अल्बम ‘डॉट फॉरगेट’ असून, तो सप्टेंबर २००८ रोजी रिलीज झाला होता.