Join us

​कोल्ड प्लेची लाट, तरुणाईसह सेलिब्रिटी बेधुंद !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2016 13:11 IST

आपल्या संगीताच्या तालावर तरुणाईला वेड लावणा-या जगप्रसिद्ध ब्रिटीश रॉक बँड कोल्ड प्लेची झलक लाट मुंबईत धडकली. या लाटेत जणू ...

आपल्या संगीताच्या तालावर तरुणाईला वेड लावणा-या जगप्रसिद्ध ब्रिटीश रॉक बँड कोल्ड प्लेची झलक लाट मुंबईत धडकली. या लाटेत जणू सारी तरुणाई वाहून गेल्याचे चित्र मुंबईतल्या बीकेसीमध्ये पाहायला मिळाले.लोकमत समुह पार्टनरचा ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हल इंडियाच्या निमित्ताने आयोजित ख्रिस मार्टिनच्या कोल्ड प्ले रॉक बँड याचि देही याचि डोळा अनुभवण्यासाठी मुंबईतल्या तरुणाईची पावलं सकाळपासूनच बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानाकडे वळत होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी तरुणाईचा जणू सागर उसळला होता. गायक ख्रिस मार्टिन याने तरुणाईला तर वेड लावलेच आहे. मात्र चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी मंडळीवरील ख्रिसच्या संगीताची जादूही सा-यांना अनुभवता आली.  या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण कोल्ड प्ले रॉक बँड होता. मात्र असे असले तरी ख्रिसच्या कार्यक्रमाआधी या ख्रिसच्या संगीताची जादू या सेलिब्रिटी मंडळींवर झाल्याचे दिसून आले. चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी एकामागून एक व्यासपीठावर येत धमाकेदार सादरीकरण तर केले शिवाय ख्रिसच्या कोल्ड प्ले आणि विविध सामाजिक कार्याला आपला पाठिंबा असल्याचेही सांगितले. या सेलिब्रिटी मंडळींमध्ये चित्रपटसृष्टीचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन, किंग खान शाहरुख खान, ऑस्कर आणि ग्रॅमी पुरस्कार विजेता ए.आर.रेहमान यांच्यासह बॉलीवुडच्या दिग्गज मंडळींनी परफॉर्मन्स देत उपस्थितांची मने जिंकली. बिग बी अमिताभ बच्चन यांनी अभिनेता फरहान अख्तरसह वझीर सिनेमातील अतरंगी यार हे गाणे गात तरुणाईमध्ये नवा जोष निर्माण केला. तसेच बिग बींनी आपल्या दमदार आवाजात सादर केलेल्या कवितेने सारे वातावरण भारावून गेले.ख्रिस मार्टिनच्या कोल्ड प्लेला सुरुवात होताच तरुणाई अक्षरक्षा बेधुंद झाली. ख्रिसच्या बँडच्या तालावर अवघी तरुणी थिरकली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तरुणाईचे मनोरंजन झाले शिवाय ख्रिसचा समाजजागृती आणि प्रबोधनाचा उद्देशही साध्य झाला.