Join us

क्लोए फेरीला सेल्फी काढणे पडले महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 21:46 IST

‘जियोर्डी शोर’ची अभिनेत्री क्लोए फेरी हिला तिच्या आजीसोबत सेल्फी काढणे चांगलेच महागात पडले आहे. हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झालेल्या तिच्या ...

‘जियोर्डी शोर’ची अभिनेत्री क्लोए फेरी हिला तिच्या आजीसोबत सेल्फी काढणे चांगलेच महागात पडले आहे. हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झालेल्या तिच्या आजीच्या उशाशी बसून, तिने सेल्फी काढली होती; मात्र या सेल्फीवर तिच्यावर चौफेर टीका झाल्याने क्लोएला सेल्फी काढण्याचा आता पश्चाताप होत आहे. मिरर डॉट को डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार क्लोए फेरीने हॉस्पिटलमध्ये बेडवर असलेल्या आपल्या आजीच्या उशाजवळ बसून सेल्फी काढली. यावेळी तिच्या आजीच्या तोंडावर आॅक्सिजन मास्क लावलेला दिसत असून, त्या मृत अवस्थेत बेडवर पडलेल्या दिसत आहेत; मात्र क्लोए या सेल्फीत हसत असल्याने लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. क्लोएने हा सेल्फी इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर शेअर केल्याने तिच्यावर चौफेर टीका केली गेली. लोकांचा वाढता संताप लक्षात घेऊन नंतर क्लोएने हा सेल्फी दोन्ही अकाउंटवरून डिलिट केला; मात्र तरीसुद्धा लोकांच्या संतापाचा तिला सामना करावा लागला. लोकांचा उद्रेक असा काही होता की, तिच्याशी पत्रव्यवहार करून तिला धारेवर धरले.  क्लोएचा नुसता सेल्फीच टीकेचे लक्ष्य ठरला असे नाही तर तिने फोटोखाली लिहिलेल्या कॅप्शनवरूनदेखील तिच्यावर संताप व्यक्त केला गेला. क्लोएने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, तुझ्या आत्म्याला शांती मिळो. आम्ही सर्वजण तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुला आम्ही कधीच विसरणार नाही. तू सदैव आमच्या स्मरणात राहशील.मात्र काहींनी या कॅप्शनवरून लिहले की, तू या सेल्फीमुळे सदैैव आमच्या स्मरणात राहशील. तर दूसºया एका ट्विटमध्ये म्हटले की, ट्विटवरून तुझ्या मृत आजीचा फोटो डिलीट केला. हे खरोखरच संतापजनक आणि लाजीरवाणे आहे. काहींनी तर तिच्या अकाउंटचे स्क्रीनशॉट काढून तिला पत्राद्वारे फोटो पाठविले आहेत.