Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्लार्कने खरेदी केला अलिशान बंगला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 17:12 IST

अभिनेत्री एमिलिया क्लार्क हिने कॅलिफोर्निया येथील समुद्र किनाºयाजवळील वेनिसमध्ये तब्बल ४६.५ लाख डॉलर किमतीचा बंगला खरेदी केला. एका वेबसाइटने ...

अभिनेत्री एमिलिया क्लार्क हिने कॅलिफोर्निया येथील समुद्र किनाºयाजवळील वेनिसमध्ये तब्बल ४६.५ लाख डॉलर किमतीचा बंगला खरेदी केला. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण पूर्व इंग्लंडमध्ये जन्मलेल्या आणि लोकप्रिय अमेरिकी टीव्ही शो ‘गेम आॅफ थ्रोन्स’मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या क्लार्कला कामामुळे अमेरिकेत घर खरेदी करावे लागले. फोर्ब्स साप्ताहिकाने दिलेल्या माहितीनुसार या बंगल्यात एक मोठे कपाट असून, यामध्ये जॉर्ज रेमंड रिचर्ड मार्टिन यांची सर्व पुस्तके ठेवण्याचा क्लार्क विचार करीत आहे. दरम्यान या बंगल्यात दोन बेडरूम, तीन बाथरूम आणि ३० फुटाचा स्विमिंग पूल आहे. २००९ मध्ये बांधण्यात आलेला हा बंगला २,८१७ फुटाचा आहे.