Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्रिस्टी रोमानीला कन्यारत्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2017 18:22 IST

हॉलिवूड अभिनेत्री क्रिस्टी कार्लसन रोमानी हिला कन्याप्राप्ती झाली आहे. पती ब्रेंडन रूनी आणि तिचे हे पहिलेच मूल आहे. क्रिस्टीने ...

हॉलिवूड अभिनेत्री क्रिस्टी कार्लसन रोमानी हिला कन्याप्राप्ती झाली आहे. पती ब्रेंडन रूनी आणि तिचे हे पहिलेच मूल आहे. क्रिस्टीने (३२) ही गोड बातमी फेसबुकवर पोस्ट शेअर करून दिली आहे. क्रिस्टी आणि ब्रेंडन यांनी मुलीचे नाव ‘इसबेला’ असे ठेवले असून, पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ब्रेंडन आणि मी इसबेलाच्या जन्माची घोषणा करीत आहोत. तिच्या जन्मामुळे आम्ही खूश आहोत. इसबेलाचा जन्म २४ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेदरम्यान झाला असून, ही आमच्यासाठी ख्रिसमस भेट आहे. आमच्या सर्व चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा!’क्रिस्टी आणि ब्रेंडन यांचा विवाह २०१३ मध्ये झाला होता. या दाम्पत्याने जून २०१६ रोजीच इसबेलाच्या जन्माविषयीची माहिती दिली होती. इसबेलाच्या जन्मामुळे दोघेही आनंदी आहेत.