Join us
Daily Top 2Weekly Top 5

ख्रिसचे पहिले खेळणे होते खरीखुरी 'बंदूक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 14:17 IST

अमेरिकेत बंदूक वापरण्याचा परवाना सहज मिळतो. त्यामुळे त्याठिकाणी बंदूक विकत घेण्यासाठी फार काही कष्ट घ्यावे लागत नाहीत. मात्र याचा ...

अमेरिकेत बंदूक वापरण्याचा परवाना सहज मिळतो. त्यामुळे त्याठिकाणी बंदूक विकत घेण्यासाठी फार काही कष्ट घ्यावे लागत नाहीत. मात्र याचा अर्थ असा होत नाही की, लहानपणापासून तुम्हाला बंदूक वापरता येते. परंतु अभिनेता ख्रिस प्रॅटला वयाच्या १२ व्या वर्षापासून बंदूक वापरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फिमेलफर्स्ट डॉट कॉ डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार ख्रिसला वयाच्या १२ व्या वर्षीच बंदूक मिळाली होती. याचा खुलासा खुद्द ख्रिसनेच केला आहे. तो म्हणाला की, माझ्या चुलत भावाने माझ्या आई-वडिलांशी चर्चा करून माझ्यासाठी बंदूक खरेदी केली होती. त्यासाठी लागणारे पैसे मी भरले होते. विशेष ख्रिस यास खेळण्यातील बंदूक समजायचा. त्यामुळे त्याचे पहिले खेळणे म्हणजे फायरिंग करणारी रायफल होती. तो म्हणाला की, मला माझी बीबी बंदूक खूप आवडत होती. मी ती दहा हजार वेळा चालवली होती. ते माझे पहिले खेळणे होते. ख्रिसने वयाच्या १४ व्या वर्षी स्ट्रीपरचे काम केले होते. यातून त्याला ४० डॉलर्सची कमाई केली होती. आता ख्रिसचा हा खुलासा कितपत गांभीर्याने घेतला जातो हे आगामी काळात स्पष्ट होईलच.