Join us

क्रिस मार्टिनला लग्नाच्या विचाराने पछाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 16:42 IST

आपल्या गायिकेने जगभरातील लोकांना वेड लावलेल्या ‘पॉप बॅण्ड कोल्डप्ले’चा गायक क्रिस मार्टिनला सध्या वेगळ्याच विचाराने पछाडले आहे. त्याच्या मते, ...

आपल्या गायिकेने जगभरातील लोकांना वेड लावलेल्या ‘पॉप बॅण्ड कोल्डप्ले’चा गायक क्रिस मार्टिनला सध्या वेगळ्याच विचाराने पछाडले आहे. त्याच्या मते, तो कधीच चांगला पती होऊ शकणार नाही. त्यामुळे भविष्यात त्याच्याशी कुठली मुलगी लग्न करण्यास तयार होईल, ही शंकाच आहे. याच वर्षाच्या जुलै महिन्यात क्रिसने त्याची पत्नी अभिनेत्री ग्वेनेथ पाल्ट्रो हिच्याशी घटस्फोट घेतला होता. दहा वर्ष संसार केल्यानंतर या जोडप्याने एकमेकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा तो कोणाशी लगीनगाठ बांधण्यासाठी अजिबात उत्सुक नाही. त्याच्या मते, पहिला संसार टिकविण्यास अपयश आल्याने मी दुसºया कोणाशी संसार करू शकेल याचा माझ्यात अजिबात आत्मविश्वास नाही. डेलीमेल डॉट को डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, मार्टिनला असे वाटत आहे की, दुसºयांदा त्याचे लग्न होणे शक्य नाही. गेल्या गुरुवारी मार्टिनने एका रेडिओ चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, माझ्याशी कोणीच लग्न करू इच्छित नाही. कारण मी एका वेळी एकाच व्यक्तीला वेड्यात काढू शकलो. अर्थात हे सर्व तो चेष्टामस्करी करताना तो बोलत होता.