Join us

चीन देणार हॉलीवूडला मात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2016 15:21 IST

दोन वेळा आॅस्कर पुरस्कारांचे विजेते दिग्दर्शक अँग ली यांच्या मते आगामी काळात लवकरच चीनमधील चित्रपटसृष्टी बॉक्स आॅफिसच्या बाबतीत अमेरिकन ...

दोन वेळा आॅस्कर पुरस्कारांचे विजेते दिग्दर्शक अँग ली यांच्या मते आगामी काळात लवकरच चीनमधील चित्रपटसृष्टी बॉक्स आॅफिसच्या बाबतीत अमेरिकन इंडस्ट्रीला मागे पाडेल. ‘लाईफ आॅफ पाय’ आणि ‘ब्रोकबॅक माऊंटन’ दिग्दर्शक ली बेव्हर्ली हिल्स येथे पार पडलेल्या बाफ्टा ब्रिटानिया अ‍ॅवॉर्ड समारंभात बोलत होते.काही वर्षांपर्यंत ली हे चीन आणि हॉलीवूडमधील समान दुवा म्हणून काम करत होते. ते म्हणतात की, अलिकडे चीन चित्रपटसृष्टीचा झपाट्याने झालेला विकास पाहता २०२० पर्यंत चीन जगातील सर्वात मोठे फिल्म मार्केट म्हणून उदयास येईल. अमेरिकन बॉक्स आॅफिसला मात देईल एवढे मोठे हे मार्केट होऊ शकते.एका कंपनीनुसार २०१४ साली ४.३ बिलियन डॉलर्सचा चीनी बॉक्स आॅफिस २०१९पर्यंत अमेरिकेला मागे टाकत ८.९ बिलियन डॉलर्सपर्यंत वाढणार आहे. म्हणून तर सध्या सर्वच आघाडीचे हॉलीवूड स्टुडिओज् चीनी बाजारपेठेचा फायदा घेण्यासाठी त्या देशावर लक्ष केंद्रित करीत आहेत.तरुण आणि उत्साही चीनी व्यवसायिकसुद्धा आता या व्यवसायात उतरत आहेत. चीनी कंपन्यांनी हॉलीवूड स्टुडिओजमध्ये भागीदारी घेण्याचा सपाटा लावला आहे.