ब्रुनो म्हणतो, मेहनतीने यशस्वी झालो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2016 17:56 IST
गायक ब्रुनो मार्सचे म्हणणे आहे की, अयशस्वितेमुळेच मी यशस्वी झालो. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार ब्रुनो सुरुवातीला यशस्वी नव्हता. ही ...
ब्रुनो म्हणतो, मेहनतीने यशस्वी झालो
गायक ब्रुनो मार्सचे म्हणणे आहे की, अयशस्वितेमुळेच मी यशस्वी झालो. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार ब्रुनो सुरुवातीला यशस्वी नव्हता. ही बाब त्याला नेहमीच खटकत होती. आपणही यशस्वी सिंगर व्हावे या ध्येयामुळेच तो आज यशस्वितेच्या शिखरावर आहे. ब्रुनो याने ‘बीट्स १’ ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, पडल्याशिवाय तुम्ही उभे राहू शकत नाही. तुम्हाला सर्व अडचणींचा सामना करून मार्ग काढावा लागतो. अर्थातच हे सोपे नाही. यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. कारण हे जर ऐवढे सोपे असते तर आज प्रत्येक व्यक्ती यशाच्या शिखरावर असता. मी अयशस्वितेचा सामना केलेला आहे, त्यामुळे मला यशाची किंमत माहिती आहे. मी जेव्हा या परिस्थितीतून जात होतो, तेव्हा मनात वेगवेगळे विचार येत होते. परंतु मी यासर्व बाबींवर मात करून यश प्राप्त केले. पुढे बोलतान ब्रुनो म्हणाला की, मला असे वाटते माझे संगीतच बोलायला हवे. मी एखाद्या वादग्रस्त बाबींसाठी भविष्यात ओळखला जावा अशी माझी अजिबात इच्छा नाही. मी संगीताच्या माध्यमातूनच लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करू इच्छितो. हल्ली बरेचसे सिंगर स्टारडस्ट मिळवण्यासाठी वादाचा आधार घेतात. एखाद्या विषयावर वादग्रस्त वक्तव्य करून रातोरात स्टार बनतात. मात्र माझा प्रवास असा नाही. मी मेहनतीने आज इंडस्ट्रीमध्ये स्वत:ला सिद्ध केले आहे. भविष्यातही माझा हाच प्रयत्न असेल की, लोकांनी मला माझ्या आवाजाने ओळखायला हवे. इतर सिंगरप्रमाणे वादग्रस्त वक्तव्यांमुळे माझी ओळख नसावी, असेही ब्रुनो याने यावेळी सांगितले.