ब्रँजेलिनाने घेतला खासगीमध्ये वाद मिटवण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 16:27 IST
हॉलीवूडचे सर्वात शक्तीशाली व सुंदर कपल म्हणून ख्याती असलेले अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांच्या घटस्फोटाच्या प्रकरणामध्ये आता आणखी ...
ब्रँजेलिनाने घेतला खासगीमध्ये वाद मिटवण्याचा निर्णय
हॉलीवूडचे सर्वात शक्तीशाली व सुंदर कपल म्हणून ख्याती असलेले अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांच्या घटस्फोटाच्या प्रकरणामध्ये आता आणखी एका नवीन अध्याय जोडला जातोय. अनेक चढउतारानंतर एका सेटलपर्यंत पोहचण्यास दोघांनाही यश आले आहे.नुकतेच दोघांतर्फे एक पत्रक जाहीर करून माहिती देण्यात आली की, येथून पुढे आमच्या घटस्फोटाची सर्व न्यायालयीन प्रक्रिया खासगीमध्ये होणार आहे. तरी सर्वांनी आमच्या मुलांच्या प्रायव्हसीचा विचार करून सहकार्य करावे.आतापर्यंत मीडियामध्ये दोघांमध्ये झालेल्या वादाची खडान्खडा बातमी येत असे. त्यामुळे त्यांच्या नात्यावर आणि खासकरून त्यांच्या सहा मुलांवर याचा वाईट परिणाम होताना पाहून दोघांनी कधी नव्हे ते एका विषयावर सहमती बनवून घटस्फोटाचा खटला एका खासगी न्यायाधीशाच्या निरीक्षणाखाली करण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे या प्रकरणाशी निगडित सर्व कागदपत्रे गोपनीय राखली जाणार असून ती सार्वजनिक होणार नाहीत. मुलांच्या भविष्याचा विचार करता दोघांनी समजुतदारी दाखवत हा निर्णय घेतला. मध्यंतरी ब्रॅडने अँजेलिनावर काही गुपित माहिती सार्वजनिक केल्याचा आरोप केला होता.त्याने म्हटले होते की, तिने मुलांशी संबंधित काही गुप्त माहिती सार्वजनिक केली आहे. पिटच्या मते, घटस्फोटासाठी दाखल केलेल्या फाइलच्या माध्यमातून ही माहिती सार्वजनिक केली जात आहे. खरं तर मुलांच्या कस्टडी अॅग्रीमेटसंबंधीची माहिती सार्वजनिक करण्याचे काहीच कारण नव्हते. परंतु अॅँजेलिनाने ही माहिती सार्वजनिक करून मुलांच्या भवितव्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. cnxoldfiles/a>. ब्रॅडपासून वेगळे होण्याच्या घोषणेनंतर ती प्रथमच एवढी आनंदी दिसली. मध्यंतरी तिला धुम्रपानाचे व्यसनही जडल्याचे कळाले होते. त्याचा परिणाम तिच्या आरोग्यावरही दिसून येत होता. तिकडे मुलांना भेटण्याची अधिकाधिक संधी मिळावी म्हणून ब्रॅडची धडपड सुरू आहे. मात्र न्यायालयाने त्याची ही विनंती धुडकावून लावली होती.