Join us

ब्रिटनी स्पीयर्सच्या मृत्यूचे ट्विट झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2016 22:10 IST

हल्ली सोशल मीडियावर अफवा पसरविणे नित्याचेच झाले आहे. त्यातही एखाद्या सेलिब्रिटीच्या मृत्यूची अफवा हा जणू काही मनोरंजनाचा विषयच बनला ...

हल्ली सोशल मीडियावर अफवा पसरविणे नित्याचेच झाले आहे. त्यातही एखाद्या सेलिब्रिटीच्या मृत्यूची अफवा हा जणू काही मनोरंजनाचा विषयच बनला आहे. आता यास पॉप स्टार ब्रिटनी स्पीयर्स बळी पडली असून, या अफवेमुळे तिला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्याचे झाले असे की, हॅकर्सने सोनी म्युझिक ग्लोबलचे ट्विटर अकाउंट केले. त्यावरून पॉप स्टार ब्रिटनी स्पीयर्स हिच्या मृत्यूचे ट्विट करून तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली. हॅक केलेल्या या ट्विटरवर गेल्या सोमवारी दोन ट्विट शेअर करण्यात आले. पहिल्या ट्विटमध्ये ‘ब्रिटनी स्पीयर्सच्या आत्म्याला शांती मिळो... १९८१-२०१६’ असे लिहिले होते. यावेळी अश्रू ढाळणाºया काही इमोजीही शेअर करण्यात आल्या. तर दुसरे ट्विट पहिल्या ट्विटच्या सात मिनिटांनंतर केले गेले. त्यात लिहिले की, ‘अपघातात ब्रिटनी स्पीयर्सचा मृत्यू झाला आहे, आम्ही लवकरच तुम्हाला आणखी माहिती देणार आहोत, आरआयपी ब्रिटनी!’ या दोन्ही ट्विटच्या काही मिनिटांनंतरच ब्रिटनीच्या प्रवक्त्याने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, ब्रिटनी स्वस्थ आहे. तिच्याविषयी पसरविण्यात आलेली ही निव्वळ अफवा असून, चाहत्यांनी भावनाविवश होऊ नये. दरम्यान सोनी म्युझिक ग्लोबलने हॅकर्सचा शोध घेण्यासाठी सायबर पोलिसांची मदत घेतल्याचे समजते. यापूर्वीदेखील बºयाचशा स्टार्सच्या मृत्यूची अशाप्रकारची अफवा पसरविण्यात आली होती. आता ब्रिटनी या सर्व प्रकरणावर उत्तर देणार की नाही, याविषयी तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.