Join us

ब्रिटिश पॉप सुपरस्टार जॉर्ज मायकल काळाच्या पडद्याआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2016 14:58 IST

प्रसिद्ध गायक जॉर्ज मायकल, ज्याला इंग्लंडचा पॉप सुपरस्टार म्हटले जाई, त्याचे नाताळाच्या दिवशी निधन झाले. या महान गायकाच्या मृत्यूमुळे संगीतविश्वावर शोक कळा पसरलेली आहे. सोशल मीडियावर शोकसंदेश आणि त्याच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.

डेव्हिड बोवी, प्रिन्स, लेनर्ड यासारखे संगीत विश्वातील अनेक दिग्गज कलाकार यावर्षी आपल्याला सोडून गेले. त्यामध्ये आता ब्रिटिश पॉप सुपरस्टार जॉर्ज मायकलचेदेखील नाव जोडले गेले. व्हॅम! बँडसह एेंशीच्या दशकात करिअरला सुरुवात करणाऱ्या जॉर्जचे वयाच्या ५३व्या वर्षी २५ डिसेंबर रोजी हृदय बंद पडल्याने निधन झाले.सोलो आर्टिस्ट म्हणून ‘पॉप सुपरस्टार’ अशी बिरुदावली मिळवलेल्या जॉर्जने ख्रिसमसदिनी आॅक्सफोर्डशायर येथील गोरिंगमध्ये अखेरचा श्वास घेतला. थेम्स व्हॅली पोलिसांनी मृत्यूचे कारण अद्याप निश्चित केले नसले तरी याबाबत कोणावरही संशय व्यक्त करण्यात आला नाही.जॉर्जच्या निधनाची वार्ता कळताच जगभरातून विविध सेलिब्रेटी आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर शोकसंदेश पोस्ट करण्यास सुरुवात केली. त्याचा पूर्व बँड सदस्य अँड्य्रू रिजलेने ट्विट करून ‘अत्यंत प्रिय मित्र जाण्याने दु:ख झाल्याचे’ कळवले. जॉर्जचे टोपणनाव ‘योग’चा उल्लेख क रीत त्याने लिहिले की, ‘केवळ मलाच नाही तर त्याचे सर्व मित्र, चाहते आणि संपूर्ण संगीतविश्वाला खूप दु:ख झाले आहे. आम्ही कायम त्याला प्रेम करू.’‘बिटल्स’ सदस्य सर एल्टन जॉन यांनी इन्स्टाग्रामवर जॉर्जसोबतचा एक फोटो शेअर करून लिहिले की, ‘मला खूप मोठा धक्का बसला. माझा जवळचा मित्र मला सोडून गेला. तो अत्यंत प्रेमळ, मदतीसाठी सदैव तत्पर आणि सर्वोत्तम कलाकार होता. त्याच्या कुटुंबाच्या आणि चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी आहे.’तत्पूर्वी जॉर्जच्या प्रवक्त्याने जाहीर केलेल्या स्टेटमेंटद्वारे त्याच्या निधनाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. या दु:खाच्या काळात त्याच्या कुटुंबियाच्या खासगीपणाचा आदर करण्याची विनंती करण्यात आली. थेम्स व्हॅली पोलिसांनी माहिती दिली की, ‘निधनाचे कारण अद्याप निश्चित करण्यात आले नसून पोस्ट-मॉर्टमनंतरच त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल.’व्हॅम!​ : अँड्य्रू रिजले​ आणि​ जॉर्ज मायकल​जीवनपटआपल्या चार दशकांच्या कारकीर्दीमध्ये जॉर्जच्या १० कोटींपेक्षा जास्त अल्बम्सची विक्री झालेली आहे. उत्तर लंडन येथे जन्मलेल्या जॉर्जचे पूर्ण नाव जॉर्जियस कायरिकॉस पनाईटाऊ होते. शाळेतील मित्र रिजलेसोबत मिळनू त्याने व्हॅम! या बँडची स्थापना केली. इंग्लंडमध्ये चार वेळा क्रमांक १ वर त्यांची गाणी पोहचली होती. १९८७ पासून मात्र तो एकटा अल्बम करू लागला. लाखो प्रती विकलेला ‘फेथ’ हा त्याचा पहिला सोलो अल्बम.गायक, गीतकार आणि संगीत प्रोड्युसर अशी अष्टपैलू कामगीरी करणारा जॉर्ज सर्वाधिक विक्री होणाऱ्या गायकांपैकी एक मानला जातो. दिसायला देखणा आणि जादुईच्या आवाजाच्या दमावर तो लाईव्ह स्टेट शोज्ची जान होता. कुमारवयीन स्टार ते पॉप सुपरस्टार होण्याचा त्याला प्रवास अविश्वसणीय आहे. या दरम्यान त्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. तो ड्रग्सच्या आहारी गेला होता.  पोलिसांशीदेखील त्याने अनेक भांडण केले. त्याच्या अशा बेजबाबदार वर्तनामुळे त्याच्या संगीत करिअरला उतरती कळा लागली. पुढील वर्षी तो नवा अल्बम आणि वर्ल्ड टूर आयोजित करणार असल्याची चर्चा होती.  परंतु त्याआधीच तो सर्वांना सोडून गेला. अशा या महान व अफाट लोकप्रिय गायकाला ‘सीएनएक्स मस्ती’चा अखेरचा सलाम.त्याचे यूके नं. १ सिंगल्सवेक मी अप बीफोर यू गो गो (१९८४)केअरलेस व्हिस्पर (१९८४)आय अ‍ॅम यूवर मॅन (१९८५)द एज आॅफ हेव्हन (१९८६)अ डिफरंट कॉर्नर (१९८६)