Join us

ब्रेडली कूपर अन् इरिना शायकच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2017 21:24 IST

अभिनेता ब्रेडली कूपर आणि त्याची गर्लफ्रेण्ड इरिना शायक यांनी एका गोंडस बेबीचे वेलकम केले आहे. ३१ वर्षीय रशियन सुपरमॉडेल ...

अभिनेता ब्रेडली कूपर आणि त्याची गर्लफ्रेण्ड इरिना शायक यांनी एका गोंडस बेबीचे वेलकम केले आहे. ३१ वर्षीय रशियन सुपरमॉडेल इरिना २०१५ पासून ४२ वर्षीय ब्रेडली कूपर याला डेट करीत आहे. एका साप्ताहिकाने दिलेल्या माहितीनुसार दोन आठवड्यांपूर्वीच इरिनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. या व्यतिरिक्त फारशी माहिती अद्यापपर्यंत उपलब्ध होऊ शकली नसली तरी, मुलाच्या जन्मामुळे हे कपल खूपच उत्साहित असल्याचे समजते. इरिनाची प्रेग्नेंसीची बातमी गेल्यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात समोर आली होती. गेल्यावर्षी तिने व्हिक्टोरिया सीक्रेट फॅशन शोमध्ये बेबी बम्पसह वॉक केला होता. तेव्हाच ती प्रेग्नेंट असल्याची बातमी समोर आली होती. दरम्यान सध्या हे दाम्पत्य आपल्या मुलाच्या आगमनाने खूश आहेत.