Join us

ब्राइस डलास हॉवर्ड झाली ‘वजनदार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2017 20:18 IST

अमेरिकी अभिनेत्री ब्राइस डलास हॉवर्ड हिने सांगितले की, टीव्ही मालिका ‘ब्लॅक मिरर’साठी तिने जवळपास १५ किलो वजन वाढविले आहे. ...

अमेरिकी अभिनेत्री ब्राइस डलास हॉवर्ड हिने सांगितले की, टीव्ही मालिका ‘ब्लॅक मिरर’साठी तिने जवळपास १५ किलो वजन वाढविले आहे. कारण या मालिकेची कथा ‘इर्टिंग डिसआॅर्डर’ (प्रमाणापेक्षा अधिक खाण्याचे दुष्परिणाम) याच्याशी संबंधित असल्यानेच वजन वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे तिने स्पष्ट केले. ज्युरासिक वर्ल्ड सिनेमातील एक प्रसंगब्राइस सध्या पुढच्या महिन्यात शुरू होणाºया ‘जुरासिक वर्ल्ड’ सीक्वलच्या शूटिंगची तयारी करीत आहे. त्यामुळे तिला वाढविलेले वजन आता कमी करण्याचे आव्हान आहे. ब्राइसने ‘पेजिसक्स डॉट कॉमशी बोलताना म्हटले की, मी दोन्ही प्रोजेक्टसाठी खूप मेहनत घेत आहे. मालिकेसाठी १५ किलो वजन वाढविणे माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक होते. आता जुरासिक वर्ल्डच्या सीक्वलसाठी पुन्हा कमी करणे या विचारानेच मी चिंतित आहे, परंतु माझ्या मित्रांनी वजन वाढविण्यापेक्षा कमी करणे अधिक सोपे असल्याचे सांगितल्याने मी सकारात्मक विचारातून याकडे बघत आहे. जुरासिक वर्ल्डची शुटिंग पुढच्याच महिन्यात सुरू होणार असल्याने माझ्याकडे खूपच कमी कालावधी आहे. त्यासाठी मी सर्वोत्तपरी प्रयत्न करीत असून, मला पुन्हा स्लीम फिगर होण्याविषयीचा आत्मविश्वास असल्याचेही तिने सांगितले. वजनदार ब्राइस डलास हॉवर्ड‘ब्लॅक मिरर’ या मालिकेच्या स्क्रीप्ट डिमांडनुसार ब्राइसला वजन वाढवावे लागले. मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस आल्यानेच तिने हा धाडसी निर्णय घेतला होता. आता जुरासिक वर्ल्डसारख्या मोठ्या बॅनरच्या हॉलिवूडपटासाठी काम करावे लागत असल्याने तिला पुन्हा वजन कमी करावे लागणार आहे. यासाठी सध्या तिने खाण्यावर बरेचसे बंधने लादले आहेत. त्याचबरोबर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ती जीमचादेखील आधार घेत असून, वेळोवेळी तज्ज्ञांचा सल्लाही घेत आहे.