ब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री! अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2018 10:43 IST
लोकप्रीय हॉलिवूड स्टार ब्रॅड पिट याचा ‘लेडी लव्ह’चा शोध अखेर संपला. होय, अँजेलिना जोलीपासून विभक्त झाल्यानंतर ब्रॅडच्या आयुष्यात एका ...
ब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री! अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर!!
लोकप्रीय हॉलिवूड स्टार ब्रॅड पिट याचा ‘लेडी लव्ह’चा शोध अखेर संपला. होय, अँजेलिना जोलीपासून विभक्त झाल्यानंतर ब्रॅडच्या आयुष्यात एका नव्या सुंदरीची एन्ट्री झालीय. सौंदर्याची खाण असलेल्या या सुंदरीने ब्रॅड पिटला अशी काही मोहिनी घातलीय की, ब्रॅड सध्या तिची तारीफ करताना थकत नाहीये. ब्रॅडच्या आयुष्यात आलेल्या या तरूणीचे ना ग्लॅमरची नाते आहे, ना अभिनयाशी. ती एक घटस्फोटित प्रोफेसर आहे. शिवाय एक अवार्ड विनिंग आर्किटेक्ट आहे. एमआयटी(Massachusetts Institute of Technology) मधून तिने पीएचडी केले आहे. आता तिचे नाव ऐकण्यास तुम्ही उत्सूक असाल तर तिचे नाव आहे, नेरी आॅक्समन. ४२ वर्षांच्या नेरीवर ब्रॅड असा काही फिदा झालाय की, नेरीपेक्षा सेक्सी अन् सुंदर गोष्ट आपण आयुष्यात बघितलीचं नाही, असे तो सांगत सुटलायं. नेरी इस्रायलची राहणारी आहे. सहा महिन्यांपूर्वी नेरी व ब्रॅडची भेट झाली होती. तिला भेटल्यानंतर ब्रॅड कमालीचा प्रभावित झाला. आता तर तो तिच्या फिलॉसॉफीचा फॅन झालाय. बॅ्रड पिट व नेरी दोघांनाही आर्ट, आर्किटेक्ट आणि डिझाईन वर्कमध्ये रस आहे. त्यामुळे सहाचं महिन्यांत दोघांची केमिस्ट्री जुळून आली. नेरी ही ‘रॉक स्टार प्रोफेसर’ म्हणून प्रसिद्ध आहे. आता तर ब्रॅड पिटसोबत नाव जुळल्यामुळे ती अधिकच लोकप्रीय झालीयं. तिचे व ब्रॅडचे नाव सध्या मीडियात चर्चेत आहे. ब्रॅडला यामुळे काहीही फरक पडत नाही. पण नेरी मात्र अशाप्रकारे अचानक प्रकाशझोतात आल्याने काहीशी चिंतीत आहे. ALSO READ : BAFTA Awards 2018 : अँजेलिना जोलीचा टॅटू अन् केट मिडेलटनचा ग्रीन गाऊन याचीच रंगली चर्चा!२०१६ मध्ये ब्रॅड पिट व अँजेलिना जोली हे कपल वेगळे झाले. त्यांची सहा मुले आहेत. २००४ मध्ये अँजेलिना व जोलीची पहिली भेट झाली होती. पुढे अँजेलिनात ब्रॅड इतका गुंतला की, एकाच वर्षात त्याने पत्नी जेनिफर अॅनिस्टनसोबतचा पाच वर्षांचा संसार तोडला. दोघेही एकत्र राहू लागले. याचवर्षी त्यांनी एका मुलीला दत्तक घेतले. २००६ मध्ये अँजेलिना ब्रॅडच्या मुलाची आई झाली. २००७ मध्ये त्यांनी आणखी दोन मुलांना दत्तक घेतले आणि २००८ मध्ये जोली व ब्रॅड यांना जुळी मुले झालीत. २०१२ मध्ये दोघांचा साखरपुडा झाला आणि याच्या दोन वर्षानंतर लग्न. पण २०१६ मध्ये हे लग्न तुटले अन् जोली व ब्रॅड कायमचे विभक्त झालेत.