Join us
Daily Top 2Weekly Top 5

काही सेकंदाच्या भूमिकेसाठी ब्रॅड पिटने घेतली इतकी फी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 18:06 IST

 हॉलिवूडचा सुपरस्टार ब्रॅड पिटने काही सेकंदाच्या भूमिकेसाठी किती फी घ्यावी? काही अंदाज? होय, ‘डेडपूल2’ या चित्रपटात ब्रॅड पिट अतिथी भूमिकेत आहे. काही सेकंदाची ही भूमिका ब्रॅड करणार की नाही, यासाठी तो किती फी घेईल, असे अनेक प्रश्न होते. 

 हॉलिवूडचा सुपरस्टार ब्रॅड पिटने काही सेकंदाच्या भूमिकेसाठी किती फी घ्यावी? काही अंदाज? तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण फक्त एक कप कॉफी. होय, ‘डेडपूल2’ या चित्रपटात ब्रॅड पिट अतिथी भूमिकेत आहे. काही सेकंदाची ही भूमिका ब्रॅड करणार की नाही, यासाठी तो किती फी घेईल, असे अनेक प्रश्न होते. पण ब्रॅड पिटने स्वत: या चित्रपटात काम करण्याची तयारी दाखवली. याबदल्यात मला फक्त रेयॉन रेनॉल्ड (डेडपूल2चा मुख्य अभिनेता) याच्या हातची एक कप कॉफी हवी, अशी त्याची अट होती. खुद्द रेयॉनने अलीकडे ही माहिती दिली होती. ‘डेडपूल2’चे सहलेखक रीत रिस यांनीही याला दुजोरा दिला. ‘ मी ही भूमिका करणार, पण एका अटीवर. रेयॉनने मला स्वत: स्टारबक्समधून एक कप कॉफी आणून दिली तरच, असे ब्रॅड पिट आम्हाला म्हणाला. त्याचे ते शब्द ऐकून आम्हाला धक्काच बसला. इतक्या मोठ्या स्टारला कुठल्याही संवादाविना फक्त काही सेकंद दाखवणे यापेक्षा बेजबाबदारपणा काय असू शकतो. पण तरिही ब्रॅडने या रोलसाठी होकार दिला, असे रीत रिस म्हणाले.‘डेडपूल2’मध्ये ब्रॅड पिट द वेनिशरच्या भूमिकेत आहे. संपूर्ण चित्रपटात वेनिशर कुठेच दिसत नाही. फक्त काही सेकंदांसाठी तो समोर येतो आणि वेनिशर म्हणजे ब्रॅड पिट आहे, हे दिसते. 

टॅग्स :ब्रॅड पिट