Join us  

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा मोठा दीर जो जोनस पुन्हा प्रेमात, मिस्ट्री गर्ल कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 3:01 PM

सध्या हे कपल ऑस्ट्रेलियात रोमँटिक डेट एन्जॉय करत आहे.

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा मोठा दीर जो जोनस आणि 'गेम ऑफ थ्रोन्स' फेम अभिनेत्री सोफी टर्नर गेल्या अनेक दिवसांपासून घटस्फोटांमुळे चर्चेत आहेत. दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून वेगळे होण्याची घोषणा केली होती. त्यांनी न्यायालयात विभक्त होण्यासाठी अर्ज केला आहे. सोफी टर्नरपासून वेगळं झाल्यानंतर आता जो जोनसच्या आयुष्यात नवं प्रेम आल्याची चर्चा आहे. दोघांचे काही रोमँटिक फोटो व्हायरल झाले आहेत. मात्र, हा मिस्ट्री गर्ल कोण आहे, हे माहीत आहे का?

आता घटस्फोटानंतर जो जोनासच्या आयुष्यात नवीन प्रेम आलं आहे. हे आम्ही म्हणत नसून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो हेच सांगत आहेत. जो जोनासचे काही फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तो त्याची नवीन गर्लफ्रेंड स्टॉर्म ब्रीसोबत किस करताना दिसत आहे. सध्या हे कपल ऑस्ट्रेलियात रोमँटिक डेट एन्जॉय करत आहे. फोटोंमध्ये दोघांमध्ये खास बाँन्डिंग असल्याचे ठळकपणे दिसून येत आहे. 

सोफी टर्नर आणि जो जोनस हे २०१६ पासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये साखरपुडा केला. तर, २०१९ मध्ये लग्न केलं. लग्नगाठ बांधून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. परंतु, लग्नाच्या चार वर्षांनंतर दोघांच्याही नात्यात दुरावा आला. जो आणि सोफी यांनी २०२० मध्ये त्यांच्या पहिल्या मुलीचे स्वागत केले होते, तर २०२२ मध्ये त्यांनी दुसऱ्या मुलीला जन्म दिला होता.

प्रियांकाचा नवरा निक जोनास हा जो जोनासचा धाकटा भाऊ आहे. सोफी आणि प्रियांका एकत्र स्पॉट व्हायच्या तेव्हा त्यांच्यातील बाँडिंग स्पष्ट दिसायचे. शिवाय प्रियांका-निकच्या लग्नासाठी जोनास कुटुंबियांसह सोफी भारतातही आली होती. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास जो आणि सोफी दोघेही आपापल्या करिअरमध्ये व्यग्र आहेत. जो आपल्या भावांसोबत कॉन्सर्टसाठी रवाना झाला असून सोफीचे विविध टीव्ही शो आणि चित्रपटांचे काम सुरू आहे. 

टॅग्स :प्रियंका चोप्रासेलिब्रिटीबॉलिवूडहॉलिवूड