Join us
Daily Top 2Weekly Top 5

Body Shaming : ...म्हणे प्रियंका चोपडाचे नाक धड नाही अन् बॉडीचा आकारही बेढब आहे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2017 14:37 IST

अभिनेत्री प्रियंका चोपडा हिला एका प्रोड्युसरने चक्क तू बेढब दिसत असल्याचे म्हटल्याने तिला जबरदस्त शॉक बसला होता. होय, हे खरे आहे. करिअरच्या सुरुवातीला प्रियंकाला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला असल्याचा खुलासा तिनेच एका कार्यक्रमादरम्यान केला.

एक सर्वसामान्य मुलगी विश्वसुंदरीचा ताज परिधान केल्यानंतर बॉलिवूडमध्ये टॉपच्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळवते. पुढे हॉलिवूडमध्येही आपल्या सौंदर्य अन् अभिनयाने जगभरातील प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवते, अशा अभिनेत्री प्रियंका चोपडा हिला एका प्रोड्युसरने चक्क तू बेढब दिसत असल्याचे म्हटल्याने तिला जबरदस्त शॉक बसला होता. होय, हे खरे आहे. करिअरच्या सुरुवातीला प्रियंकाला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला असल्याचा खुलासा तिनेच एका कार्यक्रमादरम्यान केला. अमेरिकेचा टॉक शो ‘द व्ह्यू’मध्ये प्रियंकाने चर्चेदरम्यान याबाबतचा खुलासा केला आहे. शोमध्ये ‘महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन’ या विषयावर चर्चा रंगली होती, त्यावेळी प्रियंकाने म्हटले की, जेव्हा तिने बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली होती तेव्हा एका प्रोेड्युसरने माझे नाक धड नसल्याचे म्हटले होते. शिवाय माझ्या शरीराचा आकारही बेढब असल्याचे त्यांनी म्हटले होते. अभिनय क्षेत्रात पाऊल टाकण्याअगोदर मी एका प्रोड्युसरला भेटली होती. त्यांच्या सिनेमात काम करण्याविषयी माझी त्यांच्याशी चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे त्यावेळी मी ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकली होती, परंतु त्यांनी माझ्याविषयी जे काही उद्गार काढलेत ते ऐकून मला शॉक बसला. त्यांनी म्हटले की, तुझे नाक एका सुंदर अभिनेत्रीसारखे नाही, शिवाय बॉडीशेपही बिघडलेला आहे. प्रियंकाच्या या खुलाशानंतर लगेचच शोच्या होस्टने तिला विचारले की, तुझे नाक खरे आहे का? त्यावर प्रियंकाने लगेचच उत्तर दिले की होय! मी कुठल्याही प्रकारची सर्जरी केलेली नाही. बºयाचदा लोकांना असे वाटतेय की, मी सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केलेली आहे, परंतु अशा लोकांना मी स्पष्ट करू इच्छिते की, मी कुठल्याही प्रकारची सर्जरी केलेली नाही. प्रियंका चोपडा अमेरिकन टॉक शो ‘द व्ह्यू’मध्ये सहभागी झाली असतानाप्रियंकाने यावेळी महिलांच्या फिगरविषयी चुकीचा दृष्टिकोन ठेवणाºयांविषयीही मत व्यक्त केले. ती म्हणाली की, लोकांच्या मनात महिलांना कुठल्या दृष्टिकोनातून बघायला हवे याविषयीची पक्की धारणा निर्माण झालेली आहे. त्यातच तुम्ही अभिनय क्षेत्राशी संबंधित असाल अन् तुमचे शरीर वाढले असेल तर लोक लगेचच बॉडी शेमिंग करायला सुरुवात करतात, असेही ती म्हणाली. यावेळी तिने एक पटणारे उदाहरणही दिले. ती म्हणाली की, ख्रिसमस सगळेच साजरे करतात. परंतु मी एक भारतीय आहे. होळी, दिवाळी यांसह अनेक उत्सव मी सेलिब्रेट करते. यामुळे माझ्या शरीराचा आकार बदलत असतो. त्यात मला काहीच वावगे वाटत नाही. उलट मी स्वत:ला कम्फर्ट समजते. प्रियंका चोपडासोब देव पटेलही या शोमध्ये सहभागी झाला होताप्रियंका चोपडा सध्या अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको-२’ची शूटिंग करीत आहे. या अगोदर ती अमेरिकन टीव्ही शो ‘द एलन शो, द टुनाइट शो विद जिमी फ्लोन जिमी किमेल लाइव्ह आणि द लेट शो विद स्टीफन कोलबर्ट’ यामध्ये बघावयास मिळाली आहे. या शोमध्ये ती लॉयन या प्रसिद्ध सिनेमातील अभिनेता देव पटेल याच्यासोबत आली होती. या शोचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, प्रियंकाने शोमध्ये नेमके काय म्हटले याविषयी प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. प्रियंकाच्या शोदरम्यान टिपलेल्या सध्या प्रियंका प्रसिद्धीच्या सर्वोच्च स्थानावर आहे. बॉलिवूडबरोबर ती हॉलिवूडमध्येही जबरदस्त पॉप्युलर झाली आहे. मात्र याचा अर्थ तिने बॉलिवूडशी नाते तोडले असे म्हणणे चुकीचे ठरेल. गेल्यावर्षी ती प्रकाश झा यांच्या ‘जय गंगाजल’ या सिनेमात झळकली होती. यावर्षीदेखील तिने दोन सिनेमे साइन केलेले आहेत. त्याचबरोबर १९ मे रोजी तिचा ‘बेवॉच’ हा सिनेमाही रिलिज होणार आहे.