Join us

नोबेल सोहळ्यात उपस्थित राहण्यास बॉब डिलन यांचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2016 13:59 IST

साहित्य कॅटेगिरीत नोबेल पुरस्कार विजेते अमेरिकी गायक व गीतकार बॉब डिलन याची नाराजी अद्यापही दूर झालेली दिसत नाही. पुरस्कारावर ...

साहित्य कॅटेगिरीत नोबेल पुरस्कार विजेते अमेरिकी गायक व गीतकार बॉब डिलन याची नाराजी अद्यापही दूर झालेली दिसत नाही. पुरस्कारावर प्रतिक्रिया न देणारे बॉब डिलन आता पुरस्कार सोहळ्यात सहभागी होणार नसल्याचे समजते. पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे बॉब डिलन यांनी हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे. एका वृत्तपत्र एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार स्वीडिश अ‍ॅकेडमीने बुधवारी एका पत्रद्वारे सांगितले की, बॉब डिलन यांनी आमच्याशी पत्रव्यवहार केला असून, त्यामध्ये काही व्यक्तिगत कार्यक्रमांमुळे मी या सोहळ्यात सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे. पत्रात म्हटले की, मी डिसेंबरमध्ये स्टॉकहोम येथे येवू शकणार नाही. त्यामुळे नोबेल पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. तसेच त्यांनी पुन्हा एकदा या पुरस्काराविषयी मत व्यक्त करताना म्हटले की, मी स्वत:ला या पुरस्कारामुळे खूपच सन्मानित व्यक्ती असल्याचे समजतो. अ‍ॅकेडमीतर्फे स्पष्ट करण्यात आले की, हा पुरस्कार बॉब डिलन यांचाच असून, ते समारंभात सहभागी होवू अथवा न होवू त्यांना हा पुरस्कार दिला जाईल. यापूर्वी देखील पुरस्कार्थी सोहळ्यात सहभागी झाले नसल्याचे प्रसंग उद्भवले आहेत. आम्ही संबंधित सन्मानार्थींना त्यांच्या घरी जावून पुरस्कार प्रदान केला आहे. फक्त अडचण एकाच गोष्टीची आहे. आम्ही सध्या डिलन यांच्या नोबेल भाषणची वाट पाहत आहोत. त्यांनी ते नक्कीच द्यायला हवे. त्यांना सहा महिन्याच्या आत हे भाषण देणे गरजेचे असेल. ज्याचा कालावधी १० डिसेंबर २०१६ पासून सुरू होणार आहे. स्वीडिश अ‍ॅकेडमीकडून १३ आॅक्टोबर रोजी साहित्य कॅटेगिरीत डिलन यांना नोबेल पुुरस्काराची घोषणा केली होती. त्यांना अमेरिकी गीत परंपरेसाठी सर्वोत्तम गाण्याची रचना केल्याच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार दिला गेला आहे.