Join us

ब्लॅक चिनाने गरोदरपणावरून केला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2016 22:43 IST

कर्दाशियन बहिणींनी भाऊ रॉब कर्दाशियनची पत्नी ब्लॅक चिना हिला परिवारात सामावून घेण्यास सपशेल नकार दिल्याने सध्या ब्लॅक चिनाविरुद्ध कर्दाशियन ...

कर्दाशियन बहिणींनी भाऊ रॉब कर्दाशियनची पत्नी ब्लॅक चिना हिला परिवारात सामावून घेण्यास सपशेल नकार दिल्याने सध्या ब्लॅक चिनाविरुद्ध कर्दाशियन बहिणी असा सामना बघावयास मिळत आहे. त्यातच चिनाने पहिल्यांदाच राहिलेल्या गरोदपणावरून धक्कादायक खुलासा केल्याने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ब्लॅक चीना आणि तिचा मुलगा किंग कायरोतिच्या मते, जेव्हा ती पहिल्यांदा गर्भवती राहिली होती तेव्हा ही गोष्ट लपविण्यासाठी तिच्यावर प्रचंड दबाव टाकण्यात आला होता. एनवाय डेली न्यूज डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार चिनाने ‘रॉब अ‍ॅण्ड चिना : बेबी स्पेशल’ या शोमध्ये याबाबतचा खुलासा केला आहे. ती म्हणाली की, जेव्हा मी पहिल्यांदा गरोदर होते तेव्हा माझे मातृत्व लपवण्यात आले होते. माझा बेबी शॉवरही करण्यात आला नव्हता. या गोष्टीचे मला खूपच वाईट वाटतेय. आज मी दुसºया मुलाची आई बनले आहे. मात्र अजूनही मला पहिल्या बाळंतपणाविषयीचे शल्य वाटतेय. ब्लॅक चीना आणि पती रॉब कर्दाशियनमात्र गरोदपणा लपविण्यास दबाव आणणाºया मागे नेमका कोण सूत्रधार होता? याचा मात्र तिने खुलासा केला नाही. चिनाचा पहिला मुलगा किंग कायरो आता चार वर्षांचा झाला आहे. तसेच नुकतीच ती दुसºया मुलाची आईही झाली आहे, परंतु पहिल्या बाळंतपणाच्या काही कटू आठवणी तिला आजही सतावत आहेत. या शो दरम्यान तिने वारंवार ‘गरोदरपणा लपविणे चांगली बाब नाही’ असे म्हटले.