Join us

बेन्नी गुडमॅनचा गायक बडी ग्रेको यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 20:24 IST

बेन्नी गुडमॅनच्या संगीत दुनियेत पाऊल ठेवणारे लोकप्रिय गायक आणि पियानोवादक बडी ग्रेको यांचे निधन झाले आहे. ते ९० वर्षांचे ...

बेन्नी गुडमॅनच्या संगीत दुनियेत पाऊल ठेवणारे लोकप्रिय गायक आणि पियानोवादक बडी ग्रेको यांचे निधन झाले आहे. ते ९० वर्षांचे होते. ‘दी लेडी इज ए ट्रॅम्प’साठी कायम स्मरणात राहणाºया बडी ग्रेको यांचे गेल्या मंगळवारी लॉस वेगास येथे निधन झाले. त्यांचे कौटुंबिक मित्र बार्ब डोनोहुये यांनी फेसबुकवर याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले. अरंमांडो ग्रेको यांचा जन्म फिलाडेल्फी येथे झाला होता. वयाच्या १६ यर्षी त्यांना गुडमॅनच्या आॅकेस्ट्रामध्ये गाण्याची संधी मिळाली. तब्बल २० वर्ष त्यांनी या आॅर्केस्ट्रामध्ये काम केले. पुढे त्याने आॅर्केस्ट्रा सोडल्यानंतर नाइट क्लब जॉइन केला. ग्रेको यांचे ‘दी लेडी इज ए ट्रॅम्प’ हे लोकप्रिय गीत १९६२ मध्ये प्रसिद्ध झाले होते. या गाण्याने लोकांच्या मनात त्यांच्याप्रती एक वेगळाच भाव निर्माण केला होता. त्याचबरोबर त्यांना प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावरदेखील पोहचविले होते. त्यावेळी या गीताच्या प्रती लाखोंच्या संख्येने विकल्या गेल्या. शिवाय त्यांना या गाण्याने ओळखही मिळवून दिली. त्यांचे पॉप आणि जॅज गाणेही जबरदस्त लोकप्रिय आहे. त्यांनी फ्रॅँक सिनात्रा या त्यांच्या जीवलग मित्रासाठी एका अल्बमचे रेकॉर्डही केले होते. तो अल्बमही त्याच्या चाहत्यांना भावला. दरम्यान ग्रेको यांच्या निधनाचे वृत्त प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांनी श्रद्धांजलीपर मॅसेजेस शेअर केले. तसेच पॉप आणि जॅज संगीतात त्यांना सदैव ओळखले जाणार असल्याचे मॅसेजेसदेखील शेअर करण्यात आले. त्याचबरोबर हॉलिवूडमधूनदेखील त्यांच्या निधनाचे दु:ख व्यक्त करण्यात आले आहे.