Join us  

BAFTA Awards 2018 : अँजेलिना जोलीचा टॅटू अन् केट मिडेलटनचा ग्रीन गाऊन याचीच रंगली चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 8:25 AM

काल रविवारी लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये ‘बाफ्टा अवार्ड 2018’चा (ब्रिटीश अ‍ॅकेडमी आॅफ फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन आर्ट्स) रंगारंग सोहळा रंगला. ...

काल रविवारी लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये ‘बाफ्टा अवार्ड 2018’चा (ब्रिटीश अ‍ॅकेडमी आॅफ फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन आर्ट्स) रंगारंग सोहळा रंगला. या सोहळ्याला हॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. पण या सगळ्यांत सर्वाधिक चर्चा झाली ती हॉलिवूड अभिनेत्री अँजेलीना जोली अन्  डचेज आॅफ कैम्ब्रिज केट मिडेलटन या दोघींची.होय, अँजेलीनाच्या पाठीवरच्या टॅटूने या सोहळ्यात सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. हॉलिवूडमधील लैंगिक शोषणाविरोधातील ‘मी टू आणि टाइम्स अप’ या मोहिमांना पाठींबा दर्शवत   सर्व कलाकारांनी काळ्या रंगाच्या पोशाखात या सोहळ्याला हजेरी लावली. अँजेलिना जोली ही सुद्धा आॅफ शोल्डर ब्लॅक गाऊनमध्ये सोहळ्याला पोहोचली.  अँजेलिना रेड कार्पेटवर उतरली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. विशेषत: तिच्या पाठीवरचा टॅटू सगळ्यांत लक्षवेधी ठरला. खरे तर अँजेलिनाने पहिल्यांदा टॅटू बनवलेला नाही. पण तिच्या पाठीवरचा हा ताजा टॅटू प्रोटेक्टिव टॅटू नावाने ओळखला जातो. याला खास कारणाने बनवले जाते. त्यामुळे अँजेलिनाने कुठल्या कारणाने हा खास प्रोटेक्टिव टॅटू बनवला, याचीच चर्चा रंगली.‘बाफ्टा अवार्ड 2018’मध्ये सगळे सेलिब्रिटी काळ्या रंगाच्या पोशाखात दिसले. पण ब्रिटनच्या शाही परिवाराची डचेज आॅफ कैम्ब्रिज केट मिडेलटन हिने मात्र हिरव्या रंगाच्या गाऊनमध्ये सोहळ्याला हजेरी लावली. त्यामुळे ती सगळ्यांपेक्षा वेगळी ठरली. केट सध्या गर्भवती आहे. ब्रिटनच्या शाही घराण्याच्या परंपरेनुसार, काळा रंगाचा पोशाख केवळ दु:खाच्या प्रसंगी घालतात. या राजशिष्टाचाराला डावलून केट काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसणे शक्यचं नव्हते. त्यामुळे तिने या सोहळ्यासाठी ग्रीन रंगाचा ड्रेस निवडला आणि त्यामुळे ती सगळ्यांपेक्षा वेगळी ठरली.या सोहळ्यात ‘थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड इब्बिंग, मिसौरी’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटासह  पांच ब्रिटिश बाफ्टा फिल्म पुरस्कारांवर आपले नाव कोरले. या चित्रपटात न्यायासाठी लढणा-या एका आईची कथा सांगितली आहे. फ्रांसिस मेकडॉरमंड हिला याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘डार्केस्ट अवर’ या चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेता गेरी ओल्डमैन याला बेस्ट अ‍ॅक्टरच्या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.