Join us
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅँजेलिना नव्या घराच्या शोधात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2016 16:14 IST

सध्या हॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली अभिनेत्री अँजेलिना जोली सध्या नव्या घराच्या शोधात आहे. गेल्या महिन्यात कॅलिफोर्निया येथे तिने पती ...

सध्या हॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली अभिनेत्री अँजेलिना जोली सध्या नव्या घराच्या शोधात आहे. गेल्या महिन्यात कॅलिफोर्निया येथे तिने पती ब्रॅड पिट याच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केला होता. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार अ‍ॅँजेलिना सध्या तिचा मोठा भाऊ जेम्स हेवेन याच्यासोबत पाच मुलांसह राहत आहे. मात्र तिच्यासोबत मोठा मुलगा मॅडोक्स राहत नसल्याने अ‍ॅँजेलिना निराश आहे. सुत्रानुसार सध्या अ‍ॅँजेलिना तिचा भाऊ हेवेन आणि मुले भाड्याच्या घरासाठी शोध घेत आहेत. तत्पूर्वी ते सर्वजण एका समुद्र किनारी भटकायला गेले होते. त्यांच्यासोबत सुरक्षा गार्ड आणि मुलांची आया देखील होती. यावेळी अ‍ॅँजेलिना खूप आनंदी आणि शांत दिसत होती. घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्यानंतर अद्यापपर्यंत ती सार्वजनिक ठिकाणी पहावयास मिळाली नव्हती. पहिल्यांदाच ती समुद्र किनारी फिरताना दिसली. यावेळी तिच्या चेहºयावर स्मित हास्य दिसत होते. दरम्यान अँजेलिनाने ब्रॅड पिट याच्याबरोबरचे सर्व नाते तोडले असून, त्याला विसरण्याचा ती पुरेपूर प्रयत्न करीत आहे. त्याच्या आठवणींपासून दूर जाण्यासाठीच ती घराचा शोध घेत असल्याचे समजते. दरम्यान मुलांनीही पिटला विसरावे यासाठी ती त्यांना आनंदी ठेवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करीत आहे.