एकटेपणामुळे वैतागली अॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 17:52 IST
पतीपासून विभक्त झालेली अभिनेत्री अॅँजेलिना जोली सध्या एकाकीपणाला वैतागली आहे. एकटेपणा तिला प्रचंड त्रस्थ करीत असून, ती पुन्हा एकदा ...
एकटेपणामुळे वैतागली अॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट!
पतीपासून विभक्त झालेली अभिनेत्री अॅँजेलिना जोली सध्या एकाकीपणाला वैतागली आहे. एकटेपणा तिला प्रचंड त्रस्थ करीत असून, ती पुन्हा एकदा रिलेशनशिपमध्ये राहण्यास उत्सुक आहे. रिपोटर््सनुसार, अॅँजेलिना कथितरीत्या एका रिअल स्टेट एजंटला डेट करीत आहे. ईआॅनलाइन डॉट कॉमच्या वृत्तानुसार, ४२ वर्षीय अॅँजेलिनाने आपल्या मित्रांना सांगितले की, मी पुन्हा रिलेशनशिपमध्ये पडू इच्छित नाही. परंतु ती एका वयोवृद्ध हॅण्डसम व्यक्तीबरोबर बघावयास मिळाल्याने तिच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगत आहेत. दरम्यान, ती व्यक्ती पेशाने रिअल स्टेट एजंट आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीचा सेलिब्रिटी किंवा हायप्रोफाइल जगताशी काहीही संबंध नाही. सूत्रानुसार, ब्रॅड आणि अॅँजेलिना दोघेही आपल्या डेटिंगबद्दल खूप प्रायर्व्हसी पाळतात. दरम्यान, ब्रॅडपासून विभक्त झाल्यानंतर अॅँजेलिना जोली एकाकी आयुष्य जगत आहे. मधल्या काळात अशा बातम्या आल्या होत्या की, अॅँजेलिना आणि ब्रॅड पुन्हा एकत्र येतील. परंतु सद्य:स्थिती पाहता या केवळ अफवा असल्याचे बोलले जात आहे. कारण ब्रॅड आणि अॅँजेलिना त्यांच्या आयुष्यात पुढे जाऊ इच्छितात. दोघांनीही आपापल्या वाटेने जाण्याचे ठरविले आहे. त्यामुळे हे दोघे पुन्हा एकत्र येतील ही शंका खूपच धुसर असल्याचे जाणकार सांगतात.