Join us

मुलांच्या पोटगीसाठी ब्रॅड पिटविरोधात पुन्हा कोर्टात जाणार अ‍ॅजोलिना जोली!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 12:00 IST

 होय, अँजोलिनाने तिचा पूर्वाश्रमीच्या पती ब्रॅड पिटला कोर्टात खेचण्याचा निर्णय घेतला आहे. 

हॉलिवूड अभिनेत्री अँजोलिना जोली आणि ब्रॅड पिट यांचा २०१६ मध्ये घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर मुलांचा ताबा मिळवण्यासाठी या दोघांमध्ये वाद सुरू आहे. या जोडप्यांना एकूण सहा मुले आहेत. त्यातली तीन मुले त्यांनी दत्तक घेतलीत तर तीन मुले त्यांची स्वत:ची आहेत. एकीकडे मुलांचा ताबा मिळावा यासाठी ब्रॅड पिट प्रयत्न करतो आहे तर दुसरीकडे अँजोलिना चौथे मुल दत्तक घेण्याच्या विचारात असल्याचीही चर्चा आहे. याच चर्चेदरम्यान आणखी एक ताजी बातमी आहे. होय, अँजोलिनाने तिच्या या पूर्वाश्रमीच्या पतीला कोर्टात खेचण्याचा निर्णय घेतला आहे. पीपल या इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, घटस्फोटानंतर ब्रॅड पिटने नियमितपणे मुलांच्या पोटगी दिलेला नाही. अँजोलिनाच्या प्रवक्त्याने यास दुजोरा दिला आहे. लॉस एंजिल्सच्या सुपीरिअर कोर्टात अँजोलिनाने अर्ज दाखल केला असल्याचे या प्रवक्त्याने सांगितले. ब्रॅड पिटने नियमितपणे मुलांची पोटगी द्यावी जेणेकरून ती मुलांना एक चांगले आयुष्य देऊ शकेले, असे या अर्जात म्हटले आहे.अँजोलिनाच्या वकिलाने सांगितले की, घटस्फोटानंतर ब्रॅड पिटने अँजोलिनाला मुलांची पोटगी दिलेली नाही. त्यामुळे आम्ही कोर्टाद्वारे ही पोटगी मिळवण्याचे प्रयत्न केले आहेत.

अँजोलिना आणि ब्रॅड पिट यांनी २०१६ मध्ये विवाह केला. ब्रॅड-अँजोलिना यांना मॅडॉक्स (१६), पॅक्स (१४), जाहरा (१३) शिलॉ (११) आणि ९ वर्षांची विविअन आणि नॉक्स ही जुळी मुले आहेत. मॅडॉक्स, पॅक्स, जाहरा यांना कंबोडिया, इथोपिआ आणि व्हिएतनाम येथील अनाथ आश्रमातून दत्तक घेण्यात आले आहे. तर नॉक्स, विविअन आणि शिलॉही या दोघांची मुले आहेत. दोन वर्षांपूर्वी लॉस अँजेलिसला जाताना विमानात मद्यपानानंतर ब्रॅड आणि त्याचा मुलगा मॅडॉक्समध्ये वाद झाला होता. या वादानंतर ब्रॅडच्या मद्यपानाच्या व्यसनाला कंटाळलेल्या अँजोलिनाने थेट विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. एवढेच नाही तर तिने सहा मुलांचा ताबाही स्वतःकडेच घेतला होता. मात्र मुलांचा ताबा तिच्याकडे असला तरी तिने मुलांना वडिलांना भेटण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा. अन्यथा मुलांवरचा ताबा तिला गमवावा लागेल असेही कोर्टाने तिला बजावले होते. 

टॅग्स :ब्रॅड पिट