अँड्य्रू गार्फि ल्डने केले आणखी एका पुरुषाला किस!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 15:46 IST
‘द लेट शो विथ स्टीफन कोल्बर्ट’ यो शोवर ‘सायलेंस’ चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी आलेल्या अँड्य्रू गार्फिल्डने होस्ट स्टीफन कोल्बर्टला सर्वासमोर किस केले. गेल्या रविवारी गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यातही त्याने राय रेनॉल्ड्स या अभिनेत्याला किस केले होते.
अँड्य्रू गार्फि ल्डने केले आणखी एका पुरुषाला किस!
‘द अमेझिंग स्पायडरमॅन’द्वारे नावारुपास आलेल्या अँड्य्रू गार्फिल्ड या अभिनेत्याची लाईफ सध्या खूपच अमेझिंग सुरू आहे. गोल्डन ग्लोब्स’ पुरस्कारांमध्ये ‘डेडपूल’ फेम रायन रेनॉल्ड्सला सर्वासक्षम कॅमेऱ्यासमोर किस केल्यामुळे चर्चेत असणाऱ्या अँड्य्रूने आणखी एका सेलिब्रेटी पुरुषाला राष्ट्रीय टेलिव्हिजनवर किस केले.एका किसने मन न भरल्यामुळे अँड्य्रूने प्रसिद्ध टीव्ही होस्ट स्टीफन कोल्बर्टलादेखील त्याच्या शोवर किस केले. मार्टिन स्कॉर्सेसी दिग्दर्शित ‘सायलेंस’ या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत असून त्याच्या प्रचारार्थ ‘द लेट शो विथ स्टीफन कोल्बर्ट’मध्ये तो आला होता. यावेळी स्टीफनने त्याला गोल्डन ग्लोबमधील किसबद्दल विचारून हैराण करून सोडले.अँड्य्रू म्हणाला की, ‘रायन आणि मी खूप चांगले मित्र आहोत. तो माझ्यासाठी किती स्पेशल आणि आणि मी त्याच्यावर किती प्रेम करतो हे दर्शवण्यिासाठी त्याला मैत्रीपूर्ण किस केले. तो सर्वोत्कृष्ट अभिनेताच्या कॅटेगरीमध्ये गोल्डन ग्लोबसाठी नामांकित होता. त्याला तो मिळो अथव ना मिळो, मी सदैव त्याच्यासोबत राहिल असा विश्वास मला त्याला द्यायचा होता. बोलण्याच्या ओघात कोल्बर्ट आणि गार्फिल्ड दोघांनी पर-पुरुषाला किस करण्यात काहीच गैर वाटत नसल्याचे मान्य केले. तेव्हा अँड्य्रूने लगेच कोल्बर्टला किस केले. यावर तो म्हणाला की, ‘अँड्य्रू फारच पे्रमळ प्रियकर दिसतोय.’ कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच अँड्य्रूने कोल्बर्टचे आभार व्यक्त करीत त्याच्या कामाची स्तुती केली होती.तो म्हणाला की, ‘तुम्ही जे काम करता, त्यातून मला प्रेरणा मिळते. आमच्या सर्वांच्या मनातील प्रश्नांना तुम्ही वाचा फोडता. आमचे मनोरंजनही करता. मी तुमचा खूप खूप आभारी आहे.’ मागचे वर्ष अँड्य्रूसाठी फार चांगले ठरले. मेल गिब्सन दिग्दर्शित ‘द हॅकसॉ रिज’ सिनेमातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक होत असून पुढील महिन्यात होणाऱ्या आॅस्कर पुरस्कारांमध्ये त्याला बेस्ट अॅक्टरचे नामांकनही मिळू शकते अशी चर्चा आहे.