Join us

...अन् ब्रिटनीची झाली पंचाईत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2016 16:06 IST

प्रसिद्ध गायिका ब्रिटनी स्पीयर्स हिची एका लाइव्ह शो दरम्यान चांगलीच पंचाईत झाली. तिच्या ब्राची रिप सुटल्याने तिची धांदल उडाली ...

प्रसिद्ध गायिका ब्रिटनी स्पीयर्स हिची एका लाइव्ह शो दरम्यान चांगलीच पंचाईत झाली. तिच्या ब्राची रिप सुटल्याने तिची धांदल उडाली होती. लॉस वेगासच्या प्लेनेट हॉलिवूड रिजॉर्ट आणि कॅसीनोमध्ये गेल्या शनिवारी आयोजित केलेल्या एका लाइव्ह कॉन्सर्टमध्ये ब्रिटनी गात होती. मात्र अचानक तिच्या ब्राची रिप सुटली. गाण्याच्या धुंदीत असलेल्या ब्रिटनीला ही बाब काहीकाळ समजलीच नाही. मात्र तिच्यासोबत इतरही बरेचसे कलाकार स्टेजवर असल्याने त्यांनी ब्रिटनीच्या ही बाब लक्षात आणून दिली. ब्रिटनीने तातडीने स्वत:ला सावरत रिप बसविली. मात्र हे करीत असताना तिने परफॉर्मन्स सुरूच ठेवला. त्यामुळे तिच्यासोबत असलेल्या इतर कलाकारांचादेखील उत्साह वाढला. ब्रिटनी ‘आय लव्ह रॉक आॅन लव्ह’ हे गीत गात होती. या शोसाठी हजारोंच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. प्रेक्षकांची उपस्थिती बघता ब्रिटनीदेखील अतिशय जोशात परफॉर्म करीत होती. मात्र तिच्याशी अशाप्रकारचा प्रसंग उद्भवला असतानाही तिने परफॉर्म करणे सोडले नाही. त्यामुळे तिचे उपस्थित प्रेक्षकांनीदेखील कौतुक केले. ब्रिटनीच्या परफॉर्मन्सनंतर सर्वांनी जागेवर उभे राहून टाळ्या वाजविला. तसेच अनेकांनी सोशल मीडियावरून तिचे कौतुकही केले.