पतीच्या अफवांमुळे एना त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 20:04 IST
हॉलिवूड अभिनेत्री एना फारिसचे म्हणणे आहे की, जेव्हा तिला पती क्रिस प्रॅट याच्या विवाहबाह्य संबंधाच्या अफवा कानावर पडल्या तेव्हा ...
पतीच्या अफवांमुळे एना त्रस्त
हॉलिवूड अभिनेत्री एना फारिसचे म्हणणे आहे की, जेव्हा तिला पती क्रिस प्रॅट याच्या विवाहबाह्य संबंधाच्या अफवा कानावर पडल्या तेव्हा तिच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. २००९ मध्ये प्रॅटसोबत लग्न करणाºया एना फारिसला तिच्या पतीने धोका दिल्याच्या जोरदार अफवा पसरविल्या होत्या. यामुळे एनाला खूपच मनस्ताप सहन करावा लागला. ती कोणासोबतच बोलत नव्हती. एकांतात केवळ पतीच्या विवाहबाह्य संबंधांचाच विचार करीत होती. गेल्या सात वर्षांपासून दोघेही सुखाने संसार करीत आहेत. एना फारिसने पीपुल डॉट कॉम या वेबसाइटला सांगितले की, क्रिस आणि मी या अफवांविषयी खूप चर्चा केली. याचदरम्यान आम्ही सार्वजनिक जीवनात विविध समस्यांचा सामना करीत होतो. मात्र अशात चुकीच्या अफवा पसरविल्या गेल्याने त्यांच्या संसाराचे भवितव्य लोकांवर अवलंबून होते. कारण लोक विविध प्रकारच्या अफवा पसरवित होते. वास्तविक हे सर्व एका टॅब्लॉईड मुळे घडले होते. ज्यामुळे त्यांच्यातील संबंधांमध्ये दरी निर्माण झाली होती. तसेच अफवांना तोंडही याच माध्यमातून फुटले होते. काही काळासाठी माझ्यावर या अफवांनी राज्य केले होते. मी प्रॅटबाबत त्याच पद्धतीने विचार करीत होतो. मी स्वत:ला दु:खी समजताना चिंता व्यक्त करीत असे. मला असुरक्षित असल्याची भावना वारंवार वाटत होती. मात्र, प्रॅट यांनी माझ्याप्रती त्यांच्या मनात असलेल्या प्रेमाची कबुली दिली. या सर्व अफवा होत्या, यावर माझा विश्वास बसला. अभिनेत्री एना फारिस पती क्रिस प्रॅटसोबत...