जबरदस्त परफॉर्मन्सनंतर लेडी गागावर उठली टीकेची झोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2017 21:19 IST
गेल्या आठवड्यात अमेरिकी फुटबॉल नॅशनल लीग सुपर बाउल प्रोग्राममध्ये जबरदस्त परफॉर्म करणाºया पॉपस्टार लेडी गागाला टीकेचा सामना करावा लागत ...
जबरदस्त परफॉर्मन्सनंतर लेडी गागावर उठली टीकेची झोड
गेल्या आठवड्यात अमेरिकी फुटबॉल नॅशनल लीग सुपर बाउल प्रोग्राममध्ये जबरदस्त परफॉर्म करणाºया पॉपस्टार लेडी गागाला टीकेचा सामना करावा लागत आहे. स्टेडियमच्या छतावरून एंट्री करीत उपस्थितांच्या काळाजाचा ठेका घेणारी लेडी गागा तिच्या लुकमुळे मात्र टीकेची धनी ठरली. गागाला या टीका अशा काही झोंबल्यात की ती लगेचच स्किन केअर कॉस्मेटिक सर्जरीच्या क्लिनिकमध्ये बघावयास मिळाली. एसशोबिज डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, ‘पोकर फेस’च्या गागाला गेल्या गुरुवारी क्लिनिकच्या बाहेर पडताना बघण्यात आले. जेव्हा ती क्लिनिक बाहेर आली तेव्हा केसांचा अंबाडा, डेनिम जीन्स, टॉमी हिलफिगर ब्रॅण्डचे स्वेटर तिने परिधान केलेले होते. यावेळी तिने लाल रंगाचे लिपस्टिकही लावली होती. जेव्हा गागाने सुपर बाउलमध्ये धमाकेदार परफॉर्मन्स दिला तेव्हा काही लोकांना तिच्या बाहेर आलेल्या पोटावरून टीका केली. गागामध्ये पूर्वीसारखा दम राहिला नाही. तिचा फिगर अजिबात राहिला नसून, ती कशाही पद्धतीने स्टेज शेअर करीत आहे. तिने स्वत:च्या फिगरकडे लक्ष द्यावे, त्यानंतर परफॉर्म करावा, असे एक ना अनेक टोमणे तिच्यावर मारण्यात आले. लेडी गागा स्कीन केअर कॉस्मेटिक सर्जरी क्लिनिकच्या बाहेर पडताना लोकांचे हे टोमणे बघून संतापलेल्या गागानेही एक पोस्ट शेअर करून त्यांना जशास् तसे उत्तर दिले. तिने पोस्टमध्ये लिहले की, मी असे ऐकले माझे शरीर चर्चेचा विषय बनत आहे. अशा लोकांना मला एकच सांगायचे आहे की, मला माझ्या शरीरावर गर्व असून, लोकांनाही असायला हवा. गागाची ही पोस्ट जरी टीकाकारांसाठी उत्तर असले तरी गागाला अस्वस्थ करणारी आहे. कारण लोकांच्या या टीकेमुळे ती तिच्या फिगरबाबत अधिकच विचार करायला लागली असून, त्याला मेटेण्ड ठेवण्यासाठी ती स्किन केअर क्लिनिकच्या वाºया करीत आहे.