नऊ लग्न करणाºया अभिनेत्रीचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 22:22 IST
हॉलिवूडच्या ग्लॅमर जगतात एका वेगळ्याच कारणाने स्वत:ची ओळख निर्माण करणाºया अभिनेत्री जसा गाबोर हिचे वयाच्या ९९व्या वर्षी निधन झाले. ...
नऊ लग्न करणाºया अभिनेत्रीचे निधन
हॉलिवूडच्या ग्लॅमर जगतात एका वेगळ्याच कारणाने स्वत:ची ओळख निर्माण करणाºया अभिनेत्री जसा गाबोर हिचे वयाच्या ९९व्या वर्षी निधन झाले. आपल्या लाइफस्टाइलसाठी जबरदस्त ओळखल्या जाणाºया गाबोरने एक दोन नव्हे तर तब्बल नऊ विवाह केले होते. लॉस एंजिलिस येथील तिच्या घरात तिने शेवटचा श्वास घेतला. नेहमीच आपल्या कमेंट आणि लव्ह लाइफसाठी चर्चेत राहणाºया जसा गाबोर हिचे पुरुषांप्रतीचे विचारही विवादास्पदच होते. ती म्हणायची की, पुरुष मला नेहमीच पसंत करतात आणि मीही त्यांना पसंत करते. मी एक जबरदस्त हाउसकीपर आहे. मी बºयाचशा नवºयांना सोडले, मात्र त्यांचे घर कधी सोडले नाही. मी अशा पुरुषांवर प्रेम केले, जे दयाळू आणि समजदार आहेत. त्यातही सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ते अरबपती आहेत. माझ्या मते, पुरुष तोपर्यंत एकाकी असतो जोपर्यंत त्याचे लग्न होत नाही. मात्र लग्नानंतर तो पूर्णपणे उद््ध्वस्त होतो. मी नेहमीच माझ्या जवळच्या व्यक्तींना डार्लिंग म्हणून बोलावते. कारण मला त्यांचे नाव माहीत नसते. घटस्फोटाविषयी जसाचे विचारही काही अशाच पद्धतीचे होते. तुम्ही अशा व्यक्तीवर प्रेम करूच शकत नाही, जो मुर्खासारखा वागतो, कदाचित त्यासाठी तो लग्न करीत असावा. त्यामुळे मी घटस्फोटाऐवजी वैवाहिक जीवनात राहणे पसंत करते. मला पुरुषांबरोबर संसार करायला आवडते. मला माझ्या नवºयासाठी जेवण बनवायला आवडते. अर्थात त्याच्यासाठी जो मला पसंत करतो. मी माझ्या आयुष्यातील बराचसा काळ पुरुषांबरोबर व्यतित केला असल्याचेही जसा सांगायची. जसाने १९५२ मध्ये ‘लव्हली टू लूक एट’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. तिने ७० पेक्षा अधिक हॉलिवूडपटांमध्ये काम केले आहे. १९८९ मध्ये एका पोलीस अधिकाºयाच्या कानशिलात मारल्याप्रकरणी तिला तीन दिवसांचा कारवासही भोगावा लागला. १९९३ मध्ये तिने ‘वन लाइफटाइम इज नॉट एनफ’ हे आत्मचरित्र लिहिले. यामध्ये तिने अनेक धक्कादायक खुलासे केले होते. वयाच्या १५व्या वर्षापासून मी शारीरिक संबंध ठेवत असल्याचे तिने या आत्मचरित्रात लिहिले आहे. हंगेरी येथे १९१७ मध्ये जन्मलेल्या जसाचे आयुष्य खूपच वादग्रस्त राहिले आहे. १९३६ मध्ये तिला ‘मिस हंगरी’ या किताबाने सन्मानित केले होते. मात्र वय लपविल्याच्या कारणामुळे तिच्याकडून हा किताब परत घेण्यात आला होता. जसा एका सैनिकाची मुलगी होती. तिला सर्जन बनायचे होते. मात्र आईच्या हट्टामुळे ती हॉलिवूडमध्ये आली. दुसºया युद्धानंतर तिने हंगेरी सोडले अन् अमेरिकेत स्थायिक झाली. जसाने पहिले लग्न वयाच्या २०व्या वर्षी केले होते. ७०व्या वर्षापर्यंत तिने तब्बल नऊ लग्नं केले. फेब्रुवारी २०१७ मध्ये तिचा १००वा वाढदिवस होता. मात्र त्या अगोदरच जसाचे निधन झाले. जसाला फ्रान्सेस्का नावाचा एक मुलगा आहे. हॉलिवूड स्टार पेरिस हिल्टन हिची ती आजी आहे. आपल्या वादग्रस्त लाइफस्टाइलमुळे चर्चेत राहणाºया जसाची एक्झिटही अनेकांना चटका लावणारी ठरली. जसाचा आलिशान बंगलाजसाचा नववा नवरा वॉन अनहल्ट याच्याबरोबर ती एका आलिशान बंगल्यात राहत होती. ८०० स्क्वेयर फिटच्या या बंगाल्यात सर्व सोयी-सुविधा उपलब्ध होत्या. जवळपास ७४.६९ कोटी रुपये किमतीच्या या बंगल्यात पूल, आउटसाइड एरिया, लिव्हिंग एरिया, डायनिंग रूम, ब्युटीफूल गार्डन आदि सुविधा आहेत. आर्थिक अडचणींमुळे तिने २०१३ मध्येच हा बंगाला विकला होता, परंतु घराच्या मालकाने तिला या बंगल्यात राहण्यास परवानगी दिली होती. जसाने हा बंगला १.९० कोटी रुपयांमध्ये १९७३ मध्ये खरेदी केला होता. हा बंगला खरेदी केल्याच्या दोन वर्षांनंतरच तिने डिझायनर जॅकी रॅन याच्याशी विवाह केला होता. हा तिचा सहावा विवाह होता.