Join us
Daily Top 2Weekly Top 5

हॅरी पॉटरमधल्या या अभिनेत्याने केला आपल्या प्रेयसीसोबत साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2016 12:54 IST

‘हॅरी पॉटर’ या प्रसिद्ध चित्रपटात नेविले लॉन्गबॉटमची भूमिका साकारणारा अभिनेता मॅथ्यू लुइस याने प्रियसी एंजेला जोन्स हिच्यासोबत साखरपुडा केला ...

‘हॅरी पॉटर’ या प्रसिद्ध चित्रपटात नेविले लॉन्गबॉटमची भूमिका साकारणारा अभिनेता मॅथ्यू लुइस याने प्रियसी एंजेला जोन्स हिच्यासोबत साखरपुडा केला आहे. गेल्या दहा महिन्यांपासून दोघेही एकमेकांना डेट करीत होते. टीएमजेड डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार मॅथ्यूने गेल्या महिन्यातच एंजेलासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला होता. एंजेलाचा चार महिने अगोदरच तिच्या पहिल्या पतीबरोबर घटस्फोट झाल्याने मॅथ्यू आणि एंजेला लवकरच विवाहाच्या बंधनात अडकतील असा अंदाज लावला जात होता. त्यातच दोघांनी साखरपुडा उरकून घेतल्याने लवकरच आता ते लग्न करणार असल्याची खात्रीदायक माहिती समोर येत आहे. साखरपुड्यानंतरचा पॅरिसच्या एफिल टॉवरसमोरचा दोघांचा फोटोही या वेबसाइटवर शेअर करण्यात आला. ज्यामध्ये एंजेला हिºयाची एन्गेजमेंट रिंग दाखविताना दिसत आहे. लुइस एंजेलाला गेल्या जानेवारी महिन्यात आॅरलॅँडो येथील यूनिव्हर्सल स्टुडिओमध्ये आयोजित केलेल्या एका समारंभात भेटला होता. तेथूनच दोघांची मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. लवकरच ते आता लग्न करणार असून, दोघेही एकमेकांसोबत खूश असल्याचे या वेबसाइटच्या माध्यमातून सांगण्यात आले. पॅरिसच्या एफिल टॉवरसमोर एन्गेजमेंट रिंग दाखविताना एंजेला जोन्स