अॅक्शन चित्रपट म्हटले की, आठवतात स्लिवेस्टर स्टेलॉन, अर्नाेल्ड श्वार्झनेगर, विन डिझेल यांच्यासारखे भर-भक्कम शरीरयष्टीचे हीरो. बॉलीवूडची गोष्ट म्हणाल तर ‘ढाई किलो हात’ वाला सनी देओल, कराटे स्टार अक्षय, मस्क्युलर जॉन यांची नावे डोळ्यासमोर येतात. पण अॅक्शन हीरोईन्स मात्र आपल्याकडे मोजक्याच आहेत.‘अकिरा’मध्ये सोनाक्षी, ‘गंगाजल’ची प्रियांका अशी अलिकडची उदाहरणे देता येतील. पण हॉलीवूड याला अपवाद आहे. तडफदार अॅक्शन हीरोईन्सची तिकडे मोठी परंपरा आहे. ‘क्वांटिको’ आणि ‘ट्रिपल एक्स’च्या निमित्ताने का होईना पण प्रियांका आणि दीपिकाला फूल आॅन अॅक्शन मोड पाहणे शक्य झाले.खलनायकाला ‘छठी का दूध याद दिलेनावाली’ असे वर्णन त्यांचे करण्यास काहीच हरकत नसावी. आगामी दोन डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या
‘अंडरवर्ल्ड : ब्लडवॉर्स’ या चित्रपटात केट बेकिन्सेल पुन्हा एकदा ‘सेलिन’च्या रुपात जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. त्यानिमित्ताने हॉलीवूडमधील विविध फीमेल अॅक्शन स्टार्सचा घेतलेला हा मागोवा...
१. केट बेकिन्सेल : अंडरवर्ल्ड - ब्लडवॉर्ससेलिन : केट बेकिन्सेलव्हॅम्पायर आणि वेअरवुल्फच्या अचाट विश्वातील संघर्ष मांडणाऱ्या ‘अंडरवर्ल्ड’ सीरिजमधील चित्रपटांची मु्ख्य नायिका ‘सेलिन’च्या भूमिकेत केट बेकिन्सेल या गुणी अभिनेत्रीने स्वत:ची अॅक्शन स्टार म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.‘ब्लडवॉर्स’ या पाचव्या भागात तिच्या रक्तासाठी तिच्या जीवाला चोहीबाजूने धोका आहे. जिगरबाज सेलिन मात्र हार मानणाऱ्यांपैकी नाही. प्रतिस्पर्ध्याला आयुष्यभर आठवण राहीला अशी अद्दल घडवणे तर तिची खासियत आहे.
२. उमा थरमन : द किल-बिलबेट्रिक्स किडो : उमा थरमनक्वेंटिन टॅरॅन्टिनोसारख्या अवलिया दिग्दर्शकाने ‘किल-बिल’ चित्रपटांतून ‘बेट्रिक्स किडो’च्या रुपात उमा थरमनला अल्टीमेट अॅक्शन हीरोईन म्हणून सादर केली आहे. सुंदर पण तितकीच जीवघेणी अशी बेट्रिक्स आजही प्रेक्षकांना भुरळ घालते.‘किल-बिल व्हॉल्यूम १ आणि २’ अशा दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आणि अॅक्शनचा नवा अंदाज दाखवला. म्हणून जगभरात तिसऱ्या किल-बिलची आतूरतेने वाट पाहिली जाते.
३. अँजेलिना जोली : लारा क्रॉफ्ट - टुम्ब रेडरलारा क्राफ्ट : अँजेलिना जोलीअँजेलिना जोली तिच्या ड्रामॅटिक अभिनयासाठी प्रसिद्ध होण्याआगोदर एक सेक्सी अॅक्शन स्टार म्हणून उदयास आली होती. ‘टुम्ब रेडर’ या व्हिडिओ गेमवर आधारित या चित्रपटात अँजेलिना प्रमुख नायिका ‘लारा क्राफ्ट’च्या भूमिकेत आहे.‘द इल्युमिनॅटी’ नावाच्या खलनायकाकडून प्राचीन मौल्यवान वस्तू परत मिळवण्यासाठी ती ‘जान की बाजी’ लावते. अत्यंत स्टायलाईज्ड अॅक्शनसाठी हा चित्रपट ओळखला जातो. ‘वॉन्टेड’ चित्रपटातही जोलीकडून कमालची अॅक्शन पाहायला मिळते.
४. अॅना हॅथवे : द डार्क नाईट राईजेसकॅटवुमन : अॅना हॅथवेबॅटमॅनच्या ‘डार्क नाईट’ सिरीजमधील तिसऱ्या भागात जेव्हा ‘कॅटवुमन’ असणार ही माहिती बाहेर आली तेव्हा चाहत्यांमध्ये उत्साह संचारला. अॅना हॅथवेने साकारलेली ही भूमिका संपूर्ण चित्रपटात भाव खाऊन गेली.बॅटमॅन, बेन आणि बॅटपॉडचे प्रचंड आकर्षण असूनही अॅनाची ‘कॅटवुमन’ लक्षात राहिली. बॅटमॅनच्या गाडीवर स्वार होऊन जेव्हा ती येते तेव्हा तर मग काही विचारुच नका! अशी सौंदर्यवान-खतरनाक हीरोईन कोणाला नाही आवडणार? (अपवाद तिचे वैरी!)
५. मिला जोवोव्हिच : रेसिडेन्ट एव्हिलअॅलिस : मिला जोवोविचसायन्स फिक्शन-हॉरर प्रकारातील या चित्रपट सीरिजमध्ये मिला जोवोविचने ‘अॅलिस’ नावाची शूर-निडर योद्धा रंगवलेली आहे. एका बायोइंजिनियरिंग कंपनीने बनवलेल्या व्हायरसमुळे पृथ्वीवरील मानव झॉम्बी बनून नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो.त्या कंपनीच्या सुरक्षा विभागात काम करणारी अॅलिस मग प्रशासनाविरोधात उभी राहते आणि निर्भिडपणे सामना करते. या सिरीजच्या सहा चित्रपटांनी मिळून सर्वाधिक कमाई करणारे व्हिडिओ गेमवर आधारित चित्रपट सिरीज म्हणून बहुमान मिळवलेला आहे.