Join us
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅक्टिंग आणि सिंगिंग एकाच नाण्याच्या दोन बाजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 22:13 IST

पत्नीशी घेतलेल्या घटस्फोटानंतर बराच काळ प्रसिद्धीपासून दूर राहिलेला अभिनेता तथा रॉकर जॉनी डेप पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता ...

पत्नीशी घेतलेल्या घटस्फोटानंतर बराच काळ प्रसिद्धीपासून दूर राहिलेला अभिनेता तथा रॉकर जॉनी डेप पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता त्याने कामाकडे पूर्णपणे कमबॅक केले असल्याने त्याविषयी बोलण्याला तो अधिक प्राधान्य देता आहे. एका कार्यक्रमात नुकतेच त्याने अ‍ॅक्टिंग आणि सिंगिंग यावर भाष्य केले. त्याच्या मते अ‍ॅक्ंिटग आणि सिंगिंग एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. फिमेल फर्स्ट या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार पायरेट्स आॅफ द कॅरेबियनचा अभिनेता आणि रॉक बॅण्ड ‘हॉलिवूड वॅँपायर्स’चा सदस्य सध्या त्याच्या करिअरकडे विशेष लक्ष देत आहे. त्याच्या मते, जेव्हा आपण एखादा शो किंवा शूटिंग करीत असतो तेव्हा आपल्या स्क्रिप्टनुसार काम करावे लागते. स्क्रिप्टमध्ये असलेल्या डायलॉगनुसारच तुम्हाला कॅमेºयासमोर वावरावे लागते. गाण्याच्या बाबतीतही असेच काहीसे आहे. गाणं सादर करताना त्याचे बोल तुम्हाला मनापासून आठवावे लागतात, त्यानंतरच ते ओठावर येतात. मला असे वाटते की, प्रत्येक अभिनेत्याला सीन शूट करताना याच विचाराने चालायला हवे. एखाद्यावेळेस तुम्हाला यात अपयशही येईल, परंतु तुम्ही यात यशस्वी व्हाल. अभिनयात जोखीम असतेच. त्याला सामोरे जाण्याचे प्रत्येकामध्ये धाडस असायला हवे. तुमच्या करिअरमध्ये सुधारणा घडवून आणायच्या असतील तर एकदा हे सूत्र वापरून बघा, असा सल्लाही त्याने दिला. जॉनीचे हे अचानकपणे बदललेले विचार अनेकांच्या भुवया उंचविणाºया आहेत, हे मात्र नक्की.