Join us  

गुड न्यूज! वयाच्या 83 व्या वर्षी अभिनेता चौथ्यांदा झाला बाप; 29 वर्षीय गर्लफ्रेंडने दिला मुलाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 1:19 PM

हॉलिवूडचा दिग्गज अभिनेता अल पचीनोची गर्लफ्रेंड नूर अलफल्लाहच्या प्रेग्नेंसीची गेल्या काही दिवसांत जोरदार चर्चा रंगली होती. आता अभिनेता बाबा झाला आहे.

गॉडफादर फेम 83 वर्षीय हॉलिवूडचा दिग्गज अभिनेता अल पचीनोची गर्लफ्रेंड नूर अलफल्लाहच्या प्रेग्नेंसीची गेल्या काही दिवसांत जोरदार चर्चा रंगली होती. आता अभिनेता बाबा झाला आहे. अभिनेत्याला मुलगा झाला असून त्याने त्याचं नाव देखील सांगितलं आहे. अल पचीनोच्या प्रतिनिधीने पीपल मॅगझिनला य़ाबाबत माहिती दिली असून नाव सांगितलं. या जोडप्याने आपल्या मुलाचं नाव रोमन पचीनो असं ठेवलं आहे. चाहते आता दोघांचं अभिनंदन करत आहेत. 

अल पचीनोची गर्लफ्रेंड प्रेग्नेंट असल्याची माहिती पहिल्यांदा TMZ ने शेअर केली होती. "अभिनेत्याच्या गर्लफ्रेंडच्या डिलिव्हरीच्या तारीखेला फक्त एक महिना बाकी आहे" असं अनेक  स्त्रोतांनी TMZ ला सांगितलं होतं. त्यानंतर आता हे दोघे आई-बाब झाले आहेत. 29 वर्षीय नूर अल्फल्लाह एप्रिल 2022 पासून द गॉडफादर स्टारला डेट करत आहे. त्यांच्या रिलेशनशिपबद्दलच्या अफवा पहिल्यांदा तेव्हा सुरू झाल्या जेव्हा त्यांना पहिल्यांदा एकत्र डिनर करताना पाहिलं गेलं. 

अल पचीनो चौथ्यांदा बाप झाला आहे. याआधी, तो त्याची एक्स गर्लफ्रेड आणि एक्टिंग कोच जॉन टॅरंटसह 33 वर्षीय मुलगी ज्युली मेरीचा पिता आहे. तो 1997 ते 2003 या काळात एक्स गर्लफ्रेंड बेवर्ली डी'एंजेलो हिच्यासोबत 22 वर्षीय एंटोन आणि ओलिव्हिया या जुळ्या मुलांचा बाप आहे. तर फिल्म मेकर नूर अल्फल्लाहने यापूर्वी गायक मिक जॅगर आणि मिसेनियर निकोलस बर्गरेन यांना डेट केले होतं.

क्लासिक द गॉडफादर सीरिजमधील स्टार अल पचीनोने 'स्कारफेस', 'सेंट ऑफ ए वुमन', 'हीट', 'सर्पिको', 'सी ऑफ लव्ह', 'द डेव्हिल्स एडवोकेट', 'द इनसाइडर', एंड जस्टिस फॉर ऑल', 'कार्लिटोज वे', 'डॉनी ब्रास्को', ओशन्स थर्टीनया चित्रपटात काम केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.