Join us  

तारक मेहता का उल्टा चष्मामधील बबिताचे या अभिनेत्यासोबत होते अफेअर, करायचा तिला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 3:54 PM

मुनमुन काही वर्षांपूर्वी एका अभिनेत्यासोबत नात्यात होती. हा अभिनेता तिला प्रचंड मारहाण करत असे. याच मारहाणीला कंटाळून मुनमुनने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता.

ठळक मुद्देअरमान आणि मुनमुन यांचे प्रेमप्रकरण २००८ साली सुरू झाले होते. पण काहीच काळात त्यांचे ब्रेकअप झाले. अरमानच्या रागीट स्वभावामुळे मुनमुनने त्याच्यासोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता. 

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती असून या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील बबिताची भूमिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. अतिशय स्टाईल असलेल्या या बबिताच्या प्रेक्षक अक्षरशः प्रेमात पडले आहेत असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. या मालिकेत बबिताची भूमिका मुनमुन दत्ता ही अभिनेत्री साकारत असून तिच्याविषयी काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मुनमुन दत्ताला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तिचे फॅन्स तिच्याविषयी जाणून घ्यायचा नेहमीच प्रयत्न करत असतात. मुनमुन ही आज सिंगल असून तिचे हे आयुष्य आनंदित घालवत आहे. तिला फिरायला प्रचंड आवडते. त्यामुळे ती चित्रीकरणातून वेळ मिळाल्यास नेहमीच कुठे ना कुठे फिरायला जात असते आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. मुनमुन आज सिंगल असली तरी काही वर्षांपूर्वी ती एका अभिनेत्यासोबत नात्यात होती. हा अभिनेता तिला प्रचंड मारहाण करत असे. याच मारहाणीला कंटाळून मुनमुनने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता.

अरमान कोहलीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण त्याला बॉलिवूडमध्ये यश मिळाले नाही. गेल्या काही वर्षांपूर्वी तो बिग बॉस या कार्यक्रमात झळकला होता. बिग बॉसच्या घरात असताना सगळ्यांशी भांडणे, सगळ्यांवर उगाचच ओरडणे, स्वतःच्या रागावर नियंत्रण नसणे या सगळ्या गोष्टींमुळे तो प्रचंड फेमस झाला होता. या घरात असताना अभिनेत्री काजोलची बहीण तनिषा मुखर्जी सोबत त्याचे प्रेमप्रकरण सुरू झाले होते आणि त्या दोघांचे प्रेमप्रकरण चांगले गाजले देखील होते. पण तुम्हाला माहीत आहे का, तनिषा सोबत अफेअर होण्याआधी अरमान आणि मुनमुन हे नात्यात होते. अरमान आणि मुनमुन यांचे प्रेमप्रकरण २००८ साली सुरू झाले होते. पण काहीच काळात त्यांचे ब्रेकअप झाले. अरमानच्या रागीट स्वभावामुळे मुनमुनने त्याच्यासोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता. 

अरमानने अनेकवेळा रागाच्या भरात मुनमुनवर हात उचलला असल्याचे म्हटले जाते. ही गोष्ट अभिनेत्री डॉली बिंद्राला देखील माहीत होती. मुनमुनच्या या वाईट काळात डॉलीच मुनमुनच्या पाठिशी उभी राहिली होती. अरमान मुनमुनवर रागाच्या भरात अनेकवेळा हात उचलत असल्याने मुनमुनने त्याच्यासोबत ब्रेकअप केले असल्याचे म्हटले जाते. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मामुनमुन दत्ताअरमान कोहली