Join us  

नुसता राडा! 'ॲनिमल'मध्ये रणबीरबरोबर उपेंद्र लिमयेंना पाहून हेमांगी भारावली, म्हणाली , "तुमच्या एन्ट्रीला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 4:55 PM

हेमांगी कवीनेही उपेंद्र लिमयेंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. हेमांगीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन 'ॲनिमल'मधील उपेंद्र लिमयेंचा फोटो शेअर केला आहे.

बहुचर्चित 'ॲनिमल' सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या बिग बजेट सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या 'ॲनिमल'मध्ये मराठमोळा अभिनेते उपेंद्र लिमयेही झळकले आहेत. या सिनेमात त्यांनी फ्रेडी ही भूमिका साकारली आहे. अगदी कमी वेळ स्क्रीनवर दिसूनही उपेंद्र यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. सोशल मीडियावर 'ॲनिमल'मधील उपेंद्र यांच्या सीनचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. 

मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीनेही उपेंद्र लिमयेंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. हेमांगीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन 'ॲनिमल'मधील उपेंद्र लिमयेंचा फोटो शेअर केला आहे. "राडा नुसता राडा, कडक...टाळ्या अन् शिट्ट्या वाजतात तुमच्या एन्ट्रीला," असं तिने स्टोरीमध्ये म्हटलं आहे. या स्टोरीला तिने 'ॲनिमल' सिनेमात वाजणारं अजय-अतुलचं डॉल्बीवाल्या बोलव माझ्या डिजेला हे गाणंही टाकलं आहे. हेमांगीची ही पोस्ट चर्चेत आहे. 

'ॲनिमल'मध्ये मराठमोळे अभिनेते उपेंद्र लिमये यांनी रणबीरला शस्त्र पुरविणाऱ्या फ्रेडीची भूमिका साकारली आहे. शस्त्रांचा डिलर असलेल्या फ्रेडीच्या कॉमेडीने चित्रपटातील 'ॲक्शन सीन्सला रंगत आणली आहे. या सिनेमात उपेंद्र लिमयेंनी रणबीर कपूरबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. त्यांनी साकारलेली छोटेखानी भूमिका लक्षवेधी ठरत आहे. 

"मला 'ॲनिमल' करायचा नव्हता, पण...", उपेंद्र लिमयेंचा मोठा खुलासा, म्हणाले, "एकच सीन असल्यामुळे..."

रणबीरच्या 'ॲनिमल' चित्रपटाने बॉक्स ऑफिसला पछाडलं आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी ६३.८ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर वीकेंडलाही या चित्रपटाने दमदार कमाई केली. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार या सिनेमाने सहाव्या दिवशी ३० कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत 'ॲनिमल' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ३१२.९६ कोटींचा गल्ला जमवला आहे. तर जगभरात या चित्रपटाने ५०० कोटींचा आकडा पार केला आहे.  

टॅग्स :उपेंद्र लिमये रणबीर कपूरहेमांगी कवी