Join us

‘के दिल अभी भरा नहीं’ नाटकाची पंचाहत्तरी

By admin | Updated: January 23, 2017 05:03 IST

मराठी नाटकांना जास्त प्रेक्षक मिळत नसल्याची ओरड अनेकदा केली जात असे. परंतु, आता नाट्यविश्वाला देखील सुगीचे दिवस आले

मराठी नाटकांना जास्त प्रेक्षक मिळत नसल्याची ओरड अनेकदा केली जात असे. परंतु, आता नाट्यविश्वाला देखील सुगीचे दिवस आले असून अनेक नाटकांची शंभरी होताना आपण पाहतोयं. सिनेमांपेक्षा जास्त प्रेक्षक नाटकाला पसंती देत आहेत. मराठी रंगभूमीवर एकापेक्षा एक सरस नाटके रंगमंच गाजविताना दिसतात. आता हेच पाहा ना लीना भागवत आणि मंगेश कदम यांच्या भूमिका असलेले ‘के दिल अभी भरा नहीं’ या नाटकाची नुकतीच पंचाहत्तरी झाली आहे. या नाटकाच्या टीमने त्यांचे यशस्वी पंच्याहत्तर प्रयोग पूर्ण केले आहेत. पती पत्नीच्या नात्यावर भाष्य करणाऱ्या या नाटकाला नाट्यरसिकांनी चांगलीच पसंती दर्शविली आहे. पूर्वी हे नाटक रीमा लागू आणि विक्रम गोखले यांनी आपल्या दर्जेदार अभिनयाने चांगलेच गाजविले होते. तर सध्या लीना आणि मंगेश यांची अफलातून जोडी हे नाटक यशस्वी करत असल्याचेच पाहायला मिळतेय. त्यामुळे नाट्यरसिकांना आवडत असलेले हे नाटक लवकरच शंभरी करेल यात काही शंकाच नाही.