Join us

'त्याने' थेट विद्या बालनच्या कमरेत टाकला हात

By admin | Updated: March 15, 2017 17:21 IST

विद्या तिच्या आगामी 'बेगम जान' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोलकात्याला आली होती. चित्रपटाचे निर्माते महेश भट आणि दिग्दर्शक श्रीजीत मुखर्जीही घटना घडली त्यावेळी विमानतळावर उपस्थित होते.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 15 - बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनला नुकताच कोलकाता विमानतळावर एका पुरुष चाहत्याकडून अत्यंत वाईट अनुभव आला. विद्या तिच्या आगामी 'बेगम जान' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोलकात्याला आली होती. चित्रपटाचे निर्माते महेश भट आणि दिग्दर्शक श्रीजीत मुखर्जीही घटना घडली त्यावेळी विमानतळावर उपस्थित होते. 
 
विद्या परतीचे विमान पकडण्यासाठी कोलकाता विमानतळावर आलेली असताना एक पुरुष चाहता तिथे आला. त्याला विद्याबरोबर सेल्फी फोटो काढायचा होता. फोटो काढण्यासाठी त्याने खरतर आधी विद्याला विचारायला हवे होते. पण विद्याला काही न विचारता त्याने स्पर्श करण्यास सुरुवात केली आणि सरळ विद्याच्या कमरेत हात टाकला. विद्याने लगेच त्याला रोखले आणि असे करु नको म्हणून बजावले, तरीही त्या चाहत्याने पुन्हा विद्याच्या कमरेत हात टाकला. 
 
विद्याच्या मॅनेजरनेही त्या चाहत्याला समजावले. विद्या छायाचित्रकारांना पोझ देण्यासाठी म्हणून वळली तेवढयात पुन्हा तिस-यांदा त्याने विद्याच्या कमरेत हात घातला. त्यानंतर मात्र विद्याचे पित्त खवळले. विद्याने त्या चाहत्याला चांगलेच फैलावर घेतले. त्यानंतर चाहत्याने माफी मागितली आणि सेल्फीसाठी विचारणा केली. 
 
पण विद्याने आधी वर्तणूक सुधार असे त्याला सुनावले आणि फोटो काढण्यास नकार दिला. स्पॉटबॉय ई ला दिलेल्या मुलाखतीत विद्याने ही माहिती दिली. जेव्हा अनोळखी व्यक्ती तुमच्या शरीरावर हात ठेवते तेव्हा तुम्ही अस्वस्थ होता. तो तुमच्या प्रायव्हसीमध्ये हस्तक्षेप असतो. मी पब्लिक फिगर आहे, पब्लिक प्रॉपर्टी नाही असे विद्याने सांगितले.