Join us

स्वानंदी बेर्डेचा घायाळ करणारा व्हिडीओ तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 07:15 IST

सोशल मीडियावर तिचा प्रचंड चाहतावर्ग आहे. एकसे बढकर एक फोटो शेअर करत ती चाहत्यांची वाहवा मिळवत असते.

हिंदी चित्रपटसृष्टीत आई-वडिलांच्या अभिनयाचा वारसा पुढे नेणाऱ्या कलाकारांची अनेक उदाहरणे आहेत. हाच ट्रेण्ड हळूहळू मराठी चित्रपटसृष्टीतही पाहायला मिळतो आहे. श्रिया पिळगावकर, सखी गोखले, अभिनय बेर्डे, स्वानंदी टिकेकर या मराठी कलाकारांच्या मुलांनी मनोरंजन विश्वात पदार्पण केले. या यादीत काही महिन्यांपूर्वीच स्वामिनी वाडकर हिचे नाव समाविष्ट झाले. लक्ष्याच्या अभिनयाचा वारसा अभिनयसह ही व्यक्ती पुढे चालवणार आहे. ही व्यक्ती म्हणजे लक्ष्याची लाडकी लेक स्वानंदी बेर्डे.

 

मराठीतील स्टारकिडसमध्ये स्वानंदी बेर्डेचे आघाडीवर आहे. आता अभिनयपाठोपाठ त्याची बहिण स्वानंदीसुद्धा रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार असल्याच्या चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून ऐकायला मिळत आहे.मात्र अजून तरी तिचे दर्शन रसिकांना झालेले नाही. 

सिनेमात झळकण्यापूर्वीच स्वानंदी लोकप्रिय होत आहे. सोशल मीडियावर तिचा प्रचंड चाहतावर्ग आहे. एकसे बढकर एक फोटो शेअर करत ती चाहत्यांची वाहवा मिळवत असते. नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच तिने सा-यांचे लक्ष वेधले आहे.

व्हिडीओत ती ग्लॅमरस अंदाजात चालताना पाहायला मिळत आहे. यात डिझायनर ड्रेसमध्ये तिच्या अदाही सा-यांनाच वेड लावतील अशाच आहेत. तिच्या इन्स्टापेजवर नजर टाकल्यास तुम्हाला तिच्या विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील. कधी साडीतील सोज्वळ सौंदर्य तर कधी वेस्टर्न लूकमध्ये तिच्या ग्लॅमरस अदा पाहून तुम्हीही व्हाल फिदा हे मात्र नक्की.  

टॅग्स :स्वानंदी बेर्डे