Join us

अनंत-राधिकाच्या लग्नाला हार्दिक पंड्याने नताशाशिवाय लावली हजेरी, भाऊ-वहिनीने दिली साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 09:49 IST

Anant-Radhika Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात अनेक सेलेब्स दिसले. यावेळी बॉलीवूडपासून हॉलिवूड, राजकारणापासून क्रिकेट जगतातील सेलिब्रिटीही या जोडप्याच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आले होते. दरम्यान, हार्दिक पंड्याही त्याच्या कुटुंबासोबत दिसला. मात्र हार्दिकसोबत नताशा न दिसल्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यात बिनसल्याच्या चर्चांना उधाण आलं.

अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट(Radhika Marchant)च्या लग्नात अनेक सेलेब्स दिसले. यावेळी बॉलीवूडपासून हॉलिवूड, राजकारणापासून क्रिकेट जगतातील सेलिब्रिटीही या जोडप्याच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आले होते. दरम्यान, हार्दिक पंड्या(Hardik Pandya)ही त्याच्या कुटुंबासोबत दिसला. मात्र हार्दिकसोबत नताशा स्टॅन्कोविच (Natasha Stankovitch) न दिसल्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यात बिनसल्याच्या चर्चांना उधाण आलं. 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात भारतीय क्रिकेट संघाचा स्टार हार्दिक पंड्याही दिसला होता. यावेळी हार्दिक पांड्या क्रीम रंगाच्या शेरवानीमध्ये खूपच हॅण्डसम दिसत होता. पण इथेही हार्दिक पांड्या पोहोचल्यावर तो त्याचा भाऊ कृणाल पंड्या आणि वहिनीसोबत आला होता. त्याची पत्नी नताशा स्टॅन्कोविच येथे हार्दिकसोबत दिसली नाही. लग्नात हार्दिकही डान्स करताना दिसला. त्यांच्या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.

मिस्ट्री गर्लसोबत हार्दिक दिसला होताहार्दिक आणि नताशा यांच्यात काही ठीक चालले नाही आणि ते लवकरच वेगळे होऊ शकतात असे बोलले जात आहे. नताशापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान हार्दिक पांड्या एका मिस्ट्री गर्लसोबत दिसला होता. मिस्ट्री गर्लसोबतचा हार्दिक पंड्याचा फोटो पाहून सोशल मीडियावर लोकांनी वेगवेगळे अंदाज बांधायला सुरुवात केली. या व्हायरल मुलीचे नाव प्राची सोलंकी असून ती व्यवसायाने प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आहे. त्यांचा एकत्र फोटो व्हायरल झाल्यानंतर लोक आता त्यांच्या डेटींगबद्दल अंदाज लावत आहेत.

अनंत-राधिकाच्या लग्नाला या सेलिब्रेटींनी लावली हजेरी?मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नाला अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी, गौतम गंभीर यांच्याशिवाय बॉलिवूडमधील सर्व दिग्गज व्यक्ती येथे दिसल्या. शाहरुख खान, सलमान खान, रितेश देशमुख, अनन्या पांडे, सारा अली खान, अनिल कपूर, अर्जन कपूर, माधुरी दीक्षित, संजय दत्त यांच्यासह अनेक सेलेब्स पोहोचले होते.

टॅग्स :हार्दिक पांड्यानताशा स्टँकोव्हिचअनंत अंबानी