Join us  

Video : "...झुकेगा नही साला", पाठकबाईंच्या मंगळागौरीच्या कार्यक्रमात राणादाचा 'पुष्पा'स्टाइल उखाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2023 6:37 PM

हार्दिकचा अक्षयासाठी मंगळागौर स्पेशल उखाणा, व्हिडिओ पाहिलात का?

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी आहे. 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अक्षया आणि हार्दिकचा चाहता वर्गही मोठा आहे. पाठकबाई आणि राणादा या ऑनस्क्रीन जोडीने खऱ्या आयुष्यातही लग्नगाठ बांधल्याने चाहतेही आनंदी होते. त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. नुकतीच अक्षयाची लग्नानंतरची पहिलीच मंगळागौर पार पडली.

अक्षयाबरोबर हार्दिकने मंगळागौरीच्या कार्यक्रमात सहभाग घेत ठेका धरला होता. अक्षयाच्या मंगळागौरीतील अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओत हार्दिक अक्षयाबरोबर फुगडी आणि पिंगा घालताना दिसत आहे. लग्नानंतरच्या अक्षयाच्या पहिल्याच मंगळागौरीच्या कार्यक्रमातील एका खास व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओत राणादाने पाठकबाईंसाठी स्पेशल उखाणाही घेतला आहे. 

"लव्ह यू बेबी...", निखिल बनेसाठी स्नेहल शिदमची खास पोस्ट; नेटकऱ्यांमध्ये रंगली चर्चा

हार्दिकने मंगळागौरीच्या कार्यक्रमात अक्षयासाठी पुष्पा स्टाईल उखाणा घेतला. "लग्नामध्ये घातल्या आम्ही एकमेकांना वरमाला...अक्षयाचं नाव घेतो झुकेगा नही साला", असा स्पेशल उखाणा राणादाने पाठकबाईंसाठी घेतला. 

दोन वर्षांतच मोडलेला मसाबा गुप्ताचा संसार, लेकीच्या घटस्फोटासाठी स्वत:ला दोषी ठरवतात नीना गुप्ता

'तुझ्यात जीव रंगला'मधून प्रसिद्धी मिळाल्यानंतर हार्दिक अनेक मालिकांमध्ये दिसला. सध्या तो 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. 'हर हर महादेव' या चित्रपटात हार्दिक पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिकेत दिसला होता. आता लवकरच तो 'वेडात मराठे वीर दौडले सात' या ऐतिहासिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :हार्दिक जोशीअक्षया देवधरटिव्ही कलाकारमराठी अभिनेता