Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजूबाबावर बॉलीवूडमधून शुभेच्छांचा वर्षाव

By admin | Updated: February 27, 2016 03:33 IST

तुरुंगातून सुटल्याबरोबर संजयने काय केले असेल तर एका आदर्श पतीप्रमाणे तुरुंगातील त्याची कमाई पत्नी मान्यताच्या हाती ठेवली. मुंबईत येताच तो आई नर्गिस हिच्या समाधीस्थळी गेला.

पत्नीला दिली कमाईतुरुंगातून सुटल्याबरोबर संजयने काय केले असेल तर एका आदर्श पतीप्रमाणे तुरुंगातील त्याची कमाई पत्नी मान्यताच्या हाती ठेवली. मुंबईत येताच तो आई नर्गिस हिच्या समाधीस्थळी गेला. आईच्या समाधीवर त्याने फुले चढवली. आई, मी मुक्त झालो, असे तो या ठिकाणी म्हणाला. पत्रकारांनी त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. संजयने या सर्व प्रश्नांना अतिशय संयमीपणे उत्तरे दिलीत. तुरुंगातून सुटणार, या भावनेने गेल्या चार दिवसांपासून मी झोपलो नव्हतो, तुरुंगात सगळे मला मिश्राजीच म्हणत, असेही त्याने सांगितले. सेकंड इनिंगची तयारीसंजय दत्तच्या पुनरागमनामुळे सर्वांत जास्त आनंद दिग्दर्शक राजकुमार हिरानी याने व्यक्त केला आहे. मुन्नाभाई सीरिजमधल्या तिसऱ्या चित्रपटासाठी हिरानी याने आधीच संजूबाबाला साइन केले आहे. लवकरच मुन्नाभाईची शूटिंग सुरू होणार आहे. येरवडा कारागृहातून शिक्षा भोगून परतलेल्या अभिनेता संजय दत्तच्या सुटकेबद्दल बॉलीवूडमधून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बी-टाऊनने टिष्ट्वटरद्वारे संजयला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात महेश भट, जुही चावला यांच्यासह साजिद खान व सतीश कौशिक यांचाही समावेश आहे. संजय तुझे स्वागत असो!... कायद्याने आपले काम केले... वाईट काळ संपला, नवा माणूस... नवे आयुष्य... तुला व तुझ्या कुटुंबाला शुभेच्छा! - सतीश कौशिकसंजू तुझे स्वागत! आता तुझ्याकडून चांगल्या आणि चिरस्मरणात राहतील, अशा सिनेमांची प्रतीक्षा आहे.- ऋषी कपूरघरी पुनरागमन..!!देवा, मी एक, मी दोन, मी तीन, मी चार, मी पाचशे मैल्! (नाम) वॉव.- महेश भटसंजय तू परत आलास... दत्त कुटुंबीयांसाठी सर्वांत सुखद काळ! - जुही चावला