Join us

‘हॅप्पी न्यू ईअर’ बालिश चित्रपट

By admin | Updated: November 6, 2014 02:20 IST

अभिनेत्री जया बच्चन विचार रोखठोकपणे मांडायला कधीही घाबरत नाहीत.

अभिनेत्री जया बच्चन विचार रोखठोकपणे मांडायला कधीही घाबरत नाहीत. त्यांनी त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनची भूमिका असलेला ‘हॅप्पी न्यू ईअर’ हा चित्रपट बालिश, मूर्खतापूर्ण आणि हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. मुंबईमध्ये आयोजित कार्यक्रमात जया म्हणाल्या, ‘मी हॅप्पी न्यू ईअर’ फक्त अभिषेकमुळे पाहिला. गेल्या काही वर्षांत मी पाहिलेल्या चित्रपटांपैकी हा सर्वांत वाईट चित्रपट होता. मी ही गोष्ट या चित्रपटात काम करणाऱ्या सर्वांनाच सांगितली. मी अभिषेकला सांगितले की, कॅमेऱ्यासमोर तो असा मूर्खपणा करू शकतो, म्हणजे नक्कीच एक चांगला अभिनेता आहे. जया यांच्या मते सध्या चित्रपट फक्त बिझनेससाठी बनविले जातात. त्यामुळे अशा चित्रपटांत त्या काम करीत नाहीत. चांगल्या चित्रपटाला आर्ट सिनेमा म्हटले जाते. म्हणजे काय? सर्वच सिनेमा हे आर्टच असतात. जया यांनी अमिताभ बच्चन यांना सत्यजित रे यांच्यासोबत काम करण्याचा सल्ला दिला होता.