Join us  

Birthday Special : बॉलिवूडचा डिस्को डान्सर जो एकेकाळी होता नक्षलवादी! 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2018 10:37 AM

बॉलिवूडचा डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्तीचा आज 68वा वाढदिवस आहे. त्याचा जन्म 16 जून 1950 ला कोलकातामध्ये झाला होता. असे सांगितले जाते की, सिनेमात येण्याआधी मिथुन एक नक्षलवादी होता.

मुंबई : बॉलिवूडचा डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्तीचा आज 68वा वाढदिवस आहे. त्याचा जन्म 16 जून 1950 ला कोलकातामध्ये झाला होता. असे सांगितले जाते की, सिनेमात येण्याआधी मिथुन एक नक्षलवादी होता. पण भावाच्या मृत्यूनंतर त्याला परिवाराकडे परत यावं लागलं. कारण आता घराची जबाबदारी त्याच्यावर होती. चला जाणून घेऊया त्याच्या काही खास गोष्टी...

मिथुनला लहानपणापासून डान्सची आवड होती आणि शहरात वेगवेगळ्या ठिकाणी डान्स करुन तो पैसे मिळवत असे. डान्ससोबत त्याला अभिनयाचीही आवड होती. त्यामुळे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो मुंबईत दाखल झाला. 

सुरुवातीला मिथुनने ज्युनिअर कलाकार म्हणून काम केल. त्यानंतर त्याला 'मृगया' या सिनेमात मोठी संधी मिळाली. या सिनेमातील त्याच्या कामासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. पण त्यानंतरही त्याचा स्ट्रगल कमी नाही झाला. त्याला सिनेमे मिळायला बराच वेळ लागला. 

1982 मध्ये मिथुनच्या 'डिस्को डान्सर' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला. आणि तेव्हापासून इंडस्ट्रीला एक डिस्को डान्सर मिळाला. खऱ्या अर्थाने या सिनेमामुळे मिथून लोकप्रिय झाला होता. त्यानंतर त्याने केवळ हिंदीच नाही तर बंगाली आणि उडिया भाषेतही सिनेमे केले. 

मिथुनचे वेगवेगळे अफेअर्सही त्यावेळी चांगलेच गाजले. अनेक अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेलं. सर्वातआधी त्याचं नाव जोडलं गेलं ते अभिनेत्री सारिकासोबत. पण त्यांचं हे नातं फार काळ टिकलं नातं. त्यानंतर अभिनेत्री-मॉडल हेलेना ल्यूकने खुलासा केला होता की, मिशुनने तिच्याशी गुपचूप लग्न केलंय. हे मिथुनने कधी नाकारलही नाही. पण हे नातंही फार काळ टिकलं नाही. 

मिथुनच्या लिस्टमध्ये अभिनेत्री श्रीदेवीचंही नाव होतं. जाग उठा इन्सान या सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं होतं. यावेळीच दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. इतकेच काय तर दोघांनी गुपचूप लग्न केल्याची चर्चा झाली होती. 

त्यासोबतच योगिता बालीसोबतही त्याचं अफेअर होतं. त्यांनी नंतर लग्न केलं. योगितापासून त्याला तीन अपत्य आहेत. तर एक मुलगी त्याने दत्तक घेतली आहे. योगिता बालीने किशोर कुमार यांच्याशी लग्न केलं होतं. ती त्यांची तिसरी पत्नी होती. पण त्यांना सोडून योगिताने मिथुनसोबत लग्न केलं. 

सिनेमांसोबतच मिथुन हा हॉटेल बिझनेसमध्येही आहे. उटी आणि मसूरीमध्ये त्याचे काही हॉटेल्स आहेत. 

टॅग्स :मिथुन चक्रवर्तीबॉलिवूड