मुंबई : आपल्या दमदार अदाकारीने आणि अदांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री जेनिफर विंगेट आज तिचा 32वा वाढदिवस साजरा करत आहे. मुंबईमध्ये 30 मे 1985 रोजी जन्माला आलेली जेनिफर आज टेलिव्हिजन विश्वात मोठं नाव आहे. वयाच्या 12व्या वर्षी अभिनयाला सुरुवात करणाऱ्या जेनिफरने शाका लाका बूम बूम या मालिकेतून बालकलाकार म्हणून डेब्यू केलं होतं. सध्या तिची बेपनाह ही मालिका तूफान गाजत आहे. चला जाणून घेऊया तुमच्या लाडक्या अभिनेत्रीच्या काही खास गोष्टी....
अभिनयात मोठं यश मिळाल्यानंतरही जेनिफर नेहमीच पर्सनल लाईफवरुन कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये राहिली. करण सिंह ग्रोव्हर आणि जेनिफर 'दिल मिल गए' या मालिकेच्या शूटिंग दरम्यान भेटले होते त्यानंतर त्यांनी 1012 मध्ये लग्न केले आणि 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.जेनिफर ही करणची दुसरी पत्नी होती. याआधी करणने अभिनेत्री श्रद्धा निगमसोबत लग्न केलं होतं.
करण सिंह ग्रोव्हरसोबत घटस्फोट झाल्यानंतर जेनिफर विंगेट एका मुलाखतीत म्हणाले होती की, 'जर तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये खूपआधीपासून कास करत असाल तर तुमची इच्छा नसूनही तुम्ही वेगवेगळ्या वादात अडकता. त्यामुळे आमच्या जीवनात ढवळाढवळ होत राहते. पण माझं काम मला शांत राहणं शिकवतं. कोणतीही कॉन्ट्रोव्हर्सी मला त्रास देऊ शकत नाही. अनेक गोष्टींना मी इग्नोर करते'.
- जेनिफरचा जन्म मुंबईतील एका मराठी-ख्रिश्चन परिवारात झाला. जेनिफरचे वडील हे रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये काम करतात. तर तिची आई एका पंजाबी परिवारातील आहे.
- जेनिफरचं शालेय शिक्षण सेंट झेवियर्स शाळेतून झालं. त्यानंतर जेनिफरने तिची ग्रॅज्यूएशन बॅचलर ऑफ कॉमर्समधून केजे सोमय्या ज्यूनिअर कॉलेज ऑफ सायन्स अॅन्ड कॉमर्समधून केलं.
- जेनिफरने मालिकांसोबतच 'राजा की आएगी बारात, राजा को रानी से प्यार हो गया, कुछ ना कहो, लव किया और लग गई, लाइफ reboot नहीं होती, फिर से या सिनेमांमध्येही काम केलं.
- जेनिफर ही तिच्या फिटनेससाठीही लोकप्रिय आहे. अनेकांना वाटत असेल की ती जिममध्ये मेहनत करते. पण तिला जिमला जाणं अजिबात पसंत नाही. भाज्यांचा आणि फळांचा रस हा तिचा फिटनेस फंडा आहे.
- जेनिफरचा ड्रिम रोल राणी मुखर्जीने ब्लॅकमध्ये केलेली रोल आहे.
- जेनिफर ही अभिनेत्री नसती झाली तर एअर होस्टेस झाली असती.
- जेनिफरचा आवडता रंग पांढरा आहे. त्यामुळे तिला तुम्ही नेहमीच पांढऱ्या रंगांच्या कपड्यात बघू शकता.
- जेनिफरने केलेल्या मालिका शाका लाका बूम बूम, कसौटी जिंदगी की, क्या होगा निम्मो का, संगम, देख इंडिया दे, लाफ्टर के पटाखे, कॉमेडी सर्कस, ज़रा नचके दिखा, दिल मिल गए, जोर का झटका, कॉमेडी का महा मुक़ाबला, नचलेवे विथ सरोज खान, सरस्वतीचंद्र, बेहद, बेपनाह या आहेत.