Join us
Daily Top 2Weekly Top 5

...असा घडला धोनी

By admin | Updated: September 25, 2016 03:37 IST

भारतीय संघाचे माजी सदस्य, कसोटीपटू व चांगले फलंदाज अशी ओळख असलेले किरण मोरे यांची मुंबईत क्रिकेट अकादमी आहे. भविष्यातील क्रिकेटपटू घडवित असतानाच

भारतीय संघाचे माजी सदस्य, कसोटीपटू व चांगले फलंदाज अशी ओळख असलेले किरण मोरे यांची मुंबईत क्रिकेट अकादमी आहे. भविष्यातील क्रिकेटपटू घडवित असतानाच बॉलिवूड अभिनेत्याला क्रिकेटपटू घडविण्याचे जिकिरीचे काम किरण मोरे यांना करावे लागले. ‘एम.एस. ढोनी : अनटोल्ड स्टोरी’ या आगामी चित्रपटाचा नायक सुशांतसिंग राजपूत याने किरण मोरे यांच्या अकादमीत त्यांच्या प्रशिक्षणात क्रिकेटचे धडे गिरविले. एका अभिनेत्याला क्रिकेटर घडविण्याचा अनुभव किरण मोरे यांच्याच शब्दांत...भारतीय क्रिके टचा यशस्वी कप्तान महेंद्रसिंह धोनी याच्या आयुष्यावर चित्रपट बनत असताना त्याची भूमिका साकारायला त्याच्यासारखाच मेहनती अभिनेता अपेक्षित होता. सुदैवाने सुशांतसिंह राजपूत हा धोनीसारखाच दिसतो. सुशांतनेही अतोेनात मेहनत घेऊन धोनीच्या भूमिकेला न्याय दिला तसेच विशेष म्हंणजे माझ्या प्रशिक्षणाचेही चीज झाले. मलाही सुशांतच धोनीच्या भूमिकेसाठी ‘परफेक्ट’ वाटतो. एका अभिनेत्याला क्रिकेटचा काही अनुभव नसताना त्याला एका क्रिकेटरच्या भूमिकेसाठी सज्ज करणे खूप कठीण होते. तसे सुशांतला शिकविताना मलाही बरेच काही शिकायला मिळाले. आणि तो माझ्यासाठीही मोठा अनुभव होता. कारण लहान मुलांना शिकविणे सोपे, परंतु, पंचवीस-तीस वयातील व्यक्तिला शिकविणे खूप कठीण असते. मात्र सुशांतनेही दिलेल्या प्रशिक्षणावर मेहनत तर घेतली शिवाय धोकादेखील पत्करून तो रोज सातत्याने तासनतास क्रिकेटचा सराव करायचा. सराव करत असताना सुशांतला बऱ्याचदा तोंडांला व हाताला बॉलदेखील लागले. मात्र सुशांत कधीही घाबरला नाही. एखाद्या अभिनेत्याला त्याचा चेहरा आणि हात-पायाची काळजी घेणे अनिवार्य असते, कारण त्याचे करिअर त्याच्यावरच असते, मात्र काही झाले तरी ही भूमिका मी यशस्वी पार पाडणारच असा अट्टहास सुशांतचा होता. यावरून कोणतीही भूमिका साकारताना सुशांत किती जीव ओतून त्या भूमिकेला न्याय देतो याचा प्रत्यय येत होता. धोनीची भूमिका प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सुशांत ठरल्याप्रमाणे रोज सकाळी 6.30 वाजता ग्राऊंडवर पोहचायचा. रोज कसून सराव करायचा आणि किमान चारशे बॉल खेळायचा. धोनी कसा खेळायचा, कोणता बॉल कसा पकडायचा, त्याची फलंदाजी, त्याची देहबोली याचे वेगवेगळ्या अ‍ॅँगलचे व्हिडीओ आम्ही सोबत पाहायचो आणि तसाच सराव सुशांत करायचा. सुशांत ग्राऊंडवर खेळत असताना त्याला एकदा सचिन तेंडूलकरने पाहिले आणि हा कोण नवीन खेळाडू असे विचारले. मी सांगितले की हा अभिनेता सुशांत आहे. सचिननेही त्याचे खेळणे पाहून आश्चर्य व्यक्त केल की, एका परिपूर्ण क्रिकेटरसारखाच खेळतोेय! यावरून अभिनेता ते एका यशस्वी क्रिकेटरची भूमिका सत्यात उतविताना सुशांतने किती मेहनत घेतली हे दिसून येते. सुशांत हा खरच खूप मेहनती व हुशार अभिनेता असून तो भविष्यात खूप मोठा स्टार होईल.शब्दांकन : रवींद्र मोरे