Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोविंदाने चक्क मुलीसमोरच केले दुसरे लग्न, लग्नाचे फोटो झालेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 18:51 IST

गोविंदाने दुसरे लग्न केले असून या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

ठळक मुद्देद कपिल शर्मा शो मध्ये गोविंदा त्याची पत्नी सुनीताच्या भांगेत कूंकू भरून तिच्यासोबत पुन्हा एकदा लग्न करणार आहे. गोविंदा आणि सुनीताचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून गोविंदाच्या चाहत्यांना हे फोटो प्रचंड आवडत आहेत.

द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. या आठवड्यात या कार्यक्रमात अभिनेता गोविंदा, त्याची पत्नी सुनीता आणि मुलगी टीना आहूजासोबत हजेरी लावणार आहेत.

द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात गोविंदा त्याची मुलगी टीनाच्या मिलो ना तुम या गाण्याचे प्रमोशन करताना दिसणार आहे. गोविंदा कपिल शर्मा आणि त्याच्या टीमसोबत त्याच्या खाजगी आयुष्याविषयी अनेक गप्पा गोष्टी करणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या सेटवर गोविंदा दुसरे लग्न करताना देखील दिसणार आहे. आता गोविंदा कोणाशी लग्न करतोय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना... पण गोविंदा दुसऱ्या कोणाशी नव्हे तर त्याची पत्नी सुनीतासोबतच पुन्हा एकदा लग्न करणार आहे. 

द कपिल शर्मा शो मध्ये गोविंदा त्याची पत्नी सुनीताच्या भांगेत कूंकू भरून तिच्यासोबत पुन्हा एकदा लग्न करणार आहे. गोविंदा आणि सुनीताचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून गोविंदाच्या चाहत्यांना हे फोटो प्रचंड आवडत आहेत. गोविंदा हा एक खूप चांगला डान्सर असल्याचे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. पण द कपिल शर्मा शो मध्ये त्याची पत्नी सुनीतादेखील त्याच्यासोबत ताल धरताना दिसणार आहे. या कार्यक्रमात सुनीताने एखाद्या नव्या नवरीप्रमाणेच लाल रंगाचा ड्रेल घातला होता. यात ती खूपच छान दिसत होती. 

या कार्यक्रमात गोविंदाची मुलगी टीनाला विचारण्यात आले की, तुझ्या आई-वडिलांमध्ये सगळ्यात जास्त आळशी कोण आहे? त्यावर क्षणाचाही विलंब न लावता गोविंदाच्या मुलीने सांगितले की, माझे वडील स्लिपिंग ब्यूटी असून ते कधीही झोपून जातात.

 

गोविंदाच्या पत्नीने या कार्यक्रमात अनेक गोष्टींचा खुलासा केला. तिने सांगितले की, गोविंदा कमवत असला तरी त्याच्याकडे एकही क्रेडिट कार्ड मी ठेवत नाही. सगळे क्रेडिट कार्ड हे माझ्याकडेच असतात. 

टॅग्स :गोविंदाद कपिल शर्मा शोकपिल शर्मा