Join us

गायक मुकेश यांच्या जन्मदिनानिमित्त गुगलची आदरांजली

By admin | Updated: July 22, 2016 08:26 IST

आपल्या आवाजाने अनेक गाणी अजरामर करणारे लाडके गायक मुकेश यांच्या जन्मदिनानिमित्त गुगलने डुडुलद्वारे त्यांना आदरांजली वाहिली आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 22 - ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटातील 'जीना यहाँ मरना यहाँ' हे गाणं आजही लोकांच्या ओठावर आहे. या गाणं ज्यांनी आपल्या आवाजाने अजरामर केलं ते सर्वाचे लाडके गायक मुकेश यांचा आज जन्मदिवस. त्यांच्या जन्मदिनानिमित्त गुगलनेही डुडुलद्वारे त्यांना आदरांजली वाहिली आहे. 
 
मुकेश यांचे खंर नाव मुकेशचंद माथुर पण त्यांच्या घराण्याने माथुर हे आडनाव टाकून त्याचं नाव हेच आडनाव म्हणून धारण केलं. १९४१ साली त्यांनी ‘निर्दोष’ या चित्रपटाद्वारे अभिनेता-गायक म्हणून या क्षेत्रात पदार्पण केले. पण खरया अर्थाने त्यांनी पार्श्वगायनाला सुरुवात केली ती १९४५  ला  ‘पहली नजर’ या चित्रपटातील ‘दिल जलता है..’ ह्या गाण्यापासून. हे लोकांना खुप आवडल आणी मुकेश रातोरात स्टार झाले त्यानंतर त्यांनी कधी मागे वळुन पाहिले नाही. त्यांनी आपल्या तीन दशकाच्या कारकिर्दीत २०० पेक्षा जास्त चित्रपटात पार्श्वगायन केले.
 
राज कपूर यांची झालेली भेट त्यांच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट ठरला. कारण पुढे या द्वयीने ‘आवारा’, ‘बरसात’, ‘श्री ४२०’, ‘अनाड़ी’, ‘जिस देश में गंगा बहती है’, ‘संगम’, ‘मेरा नाम जोकर’ यांसारख्या सिनेमाद्वारे काय इतिहास रचला ते आपल्या सगळ्याना माहिती आहेच. राज कपूर यांच्या यशात काही वाटा मुकेश यांच्या गाण्याचाहि होता हे कोणीही अमान्य करणार नाही. १९७४  मध्ये प्रदर्शित झालेल्या रजनीगंधा मधील  गाणे ‘कई बार यू हीं देखा…’ साठी मुकेश यांना राष्ट्रिय पुरस्कार मिळाला. मा.मुकेश यांचे २७ ऑगस्ट १९७६ रोजी निधन झाले. पण  मागे राहिला  त्यांचा अजरामर आवाज.