Join us
Daily Top 2Weekly Top 5

अर्पिता चक्रवर्तीच्या 'घे जगुनी तू' गाण्याला मिळतोय चांगला प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 17:52 IST

गायिका अर्पिता चक्रवर्तीचे 'ती अँड ती' चित्रपटातील 'घे जगुनी तू' गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

'रागिनी एमएमएस २', 'सत्याग्रह', 'हीरो' आणि इतर चित्रपटांमधील गाणींसाठी प्रसिद्ध असलेली गायिका अर्पिता चक्रवर्तीचे 'ती अँड ती' चित्रपटातील 'घे जगुनी तू' गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटात प्रार्थना बेहरे, सोनाली कुलकर्णी व पुष्कर जोग मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

"संगीत ही मानवजातीची सार्वभौम भाषा आहे. 'घे जगुनी तू' हे खरोखरच जागृत आहे कारण ते प्रेमाची भाषा बोलते आणि जीवनाच्या सुंदर संदेशावरून पास होते, असे अर्पिताने सांगितले आहे. अर्पिता चक्रवर्तीने गायलेले पैसा ये पैसा हे गाणे सध्या खूप ट्रेडिंग होत आहे. अर्पिताने पंधरा भाषेतील विविध गाणी गायली आहेत.प्रत्येक चित्रपटात नवीन काही करू बघणाऱ्या अभिनेत्री-दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी या वेळी रंगतदार कथेतून तरुण पिढीच्या मनातील कन्फ्युजन दाखवताना दिसतील. या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण हे इंग्लंड मध्ये झालेले आहे आणि या चित्रपटाची कथा-पटकथा विराजस कुलकर्णीने लिहिली आहे तसेच संवाद मर्मबंधा आणि विराजस कुलकर्णी यांचे आहेत.

चित्रपटाला संगीत साई-पियुष यांनी दिले आहे आणि चित्रपटातील धमाल गाण्यांना आवाज अवधूत गुप्ते, महालक्ष्मी अय्यर, रोहित राऊत, जुईली जोगळेकर, गौरव बुरसे आणि अर्पिता चक्रवर्ती यांनी दिला आहे. छायाचित्रणाची जबाबदारी हर्षवर्धन पाटील यांनी सांभाळली आहे तर अर्जुन मोगरे यांनी संकलन केले आहे. हा चित्रपट ८ मार्च २०१९ ला प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :ती अॅण्ड तीपुष्कर श्रोत्रीप्रार्थना बेहरेसोनाली कुलकर्णी