Join us  

The Kapil Sharma Showच्या प्रेक्षकांसाठी खुशखबर!; समोर आला नवीन प्रोमो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 2:06 PM

The Kapil Sharma Show : लोकप्रिय कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'ची नवीन तारीखही जाहीर करण्यात आली आहे. लवकरच कपिल शर्मा पुन्हा एकदा लोकांना हसवण्यासाठी येणार आहे.

ज्या कॉमेडी शोची लोक आतुरतेने वाट पाहत होते त्याचा प्रोमो समोर आला आहे. होय, आम्ही द कपिल शर्मा शो(The Kapil Sharma Show)बद्दल बोलत आहोत. हा शो पुन्हा एकदा नव्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोमध्ये एक खास गोष्ट म्हणजे या शोमध्ये अनेक जुनी पात्रे दिसणार नाहीत. या सीझनमध्ये अनेक कलाकारांना संधी देण्यात आली आहे ज्यांच्याकडे लोकांना हसवण्याची पूर्ण क्षमता आहे. या प्रोमोसोबतच 'द कपिल शर्मा शो'ची नवीन तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये कपिल शर्मा एका इस्पितळात असून अचानक त्याला शुद्धीवर आल्याचे दाखवण्यात आले आहे. तो सगळ्यांना ओळखतो पण त्याच्या पत्नीची भूमिका करणारी सुमोना चक्रवर्ती हिला ओळखत नाही आणि मग सुंदर अभिनेत्री सृष्टी रोडेचा प्रवेश होतो. त्याच्याकडे जाऊन ती कपिलसोबत फ्लर्ट करू लागते. यावेळी सृष्टी रोडेही 'कपिल शर्मा शो'मध्ये आपल्या कौशल्याची जादू दाखवणार असल्याचे या प्रोमोवरून स्पष्ट झाले आहे.

यावेळी या शोसोबत अनेक नवीन कलाकार जोडले गेले आहेत, ज्यांची नावे आहेत सिद्धार्थ सागर, गौरव दुबे, इश्तियाक खान, श्रीकांत मस्की आणि सृष्टी रोडे. याशिवाय काही जुनी पात्रे देखील शोमध्ये त्यांच्या हसण्याने लोकांचे मनोरंजन करतील आणि हे विनोदवीर आहेत कपिल शर्मा, अर्चना पूरण सिंग, किकू शारदा, सुमोना चक्रवर्ती आणि चंदन प्रभाकर. एकंदर दहा विनोदी कलाकार पुढील महिन्यापासून पुन्हा रसिकांच्या सेवेत हजर होणार आहेत.

'द कपिल शर्मा शो' पुढील महिन्यापासून म्हणजेच १० सप्टेंबरपासून सोनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे. गेल्या वेळेप्रमाणे हा शो शनिवार आणि रविवारी येणार असून वेळ रात्री ९.३० ची असेल. कपिल शर्माच्या पडद्यावर परतल्याबद्दल त्याचे चाहतेही खूप खूश आहेत.

टॅग्स :द कपिल शर्मा शोकपिल शर्मा अर्चना पूरण सिंग